लोकांमधल्या प्रतिमेला...
लोकांमधल्या प्रतिमेला सांभाळत बसलो
मी इथल्या नियमांना सार्या पाळत बसलो
सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो
ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो
दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो
प्रत्येकाने कविता केली, दाद मिळवली
मी केवळ दुःखाला या कुरवाळत बसलो
- केदार पाटणकर
(मनोगत या संकेतस्थळाच्या २००८ दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली गझल)
गझल:
प्रतिसाद
गंभीर समीक्षक
सोम, 29/12/2008 - 23:37
Permalink
गंभीर समीक्षक
गंभीर समीक्षक सहसा इतके खुष होत नाहीत. अतिशय छान गझल! कवी केदारचे अभिनंदन! प्रत्येक शेरावर भाषण करण्याची गरजच नाही. सुंदर! फारच सुंदर गझल!
भूषण कटककर
मंगळ, 30/12/2008 - 20:05
Permalink
खचॅक्क्क्क...!
केदार,
मस्तच गझल!
एकदा परत चहा व्हायला पाहिजे राव!
प्रसाद लिमये
मंगळ, 30/12/2008 - 23:02
Permalink
>>दूरदूरचा
>>दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो <<
व्वा...... काय बोलू, अप्रतीम
ज्ञानेश.
गुरु, 01/01/2009 - 00:12
Permalink
पुनश्च....
पुन्हा एकदा ही गझल तितकीच आवडली...
जितकी तुमच्याकडून ऐकतांना आवडली होती !
अभिनंदन.
गणेशप्रसाद
गुरु, 01/01/2009 - 12:57
Permalink
लोकांमधल्या प्रतिमेला...
अतिशय सुन्दर गझल! सगळे शेर कसे एकमेकाला छान तोलताहेत. याला म्हणावी चांगली गझल. खूप छान.
सन्जय उपशाम (not verified)
शुक्र, 02/01/2009 - 11:43
Permalink
बदल
ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो
हा बघ येथे मी प्राणाला जाळीत बसलो
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 02/01/2009 - 12:35
Permalink
सुन्दर गझल!
मतला आवडला. जाळत ,ठेचाळत वाले शेर आवडले.
केदार पाटणकर
शुक्र, 02/01/2009 - 14:53
Permalink
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना..
अजय अनंत जोशी
शुक्र, 02/01/2009 - 22:01
Permalink
शेवटचे दोन..
विशेष आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या
दशरथयादव
शनि, 03/01/2009 - 17:46
Permalink
वा...छान्...
वा...छान्...दोन्ही शेर आवडले
-----------------------
सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो
ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो
समीर चव्हाण (not verified)
शनि, 24/01/2009 - 11:12
Permalink
व्वा
सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो
तिलकधारी
शनि, 24/01/2009 - 11:44
Permalink
उत्तम
प्रिय मित्र केदार,
उत्तम झाली गझल!
तिलकधारी भारावून गेला.
बोलू का
शनि, 24/01/2009 - 13:30
Permalink
लोकांमधल्या प्रतिमेला
पाचच पण चांगले शेर लिहिलेत. आनंद वाटला.
(तसा मी फारसा बोलत नाही.)
प्रदीप गांधलीकर
शनि, 24/01/2009 - 17:57
Permalink
अतिशय सुंदर !
शेवटचा शेर मस्त !
मानस६
शनि, 24/01/2009 - 22:57
Permalink
पावलातल्या दगडाला
दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो .... मस्त द्विपदी
-मानस६
केदार पाटणकर
रवि, 25/01/2009 - 22:53
Permalink
धन्यवाद
धन्यवाद, सर्वांना.