लोकांमधल्या प्रतिमेला...

लोकांमधल्या प्रतिमेला सांभाळत बसलो
मी इथल्या नियमांना सार्‍या पाळत बसलो 


सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो 


ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो 


दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो 


प्रत्येकाने कविता केली, दाद मिळवली
मी केवळ दुःखाला या कुरवाळत बसलो

                                  - केदार पाटणकर

(मनोगत या संकेतस्थळाच्या २००८ दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली गझल)

गझल: 

प्रतिसाद

गंभीर समीक्षक सहसा इतके खुष होत नाहीत. अतिशय छान गझल! कवी केदारचे अभिनंदन! प्रत्येक शेरावर भाषण करण्याची गरजच नाही. सुंदर! फारच सुंदर गझल! 

केदार,
मस्तच गझल!
एकदा परत चहा व्हायला पाहिजे राव!

>>दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो <<

 

व्वा...... काय बोलू, अप्रतीम

पुन्हा  एकदा  ही  गझल  तितकीच  आवडली...
जितकी  तुमच्याकडून  ऐकतांना आवडली होती !

अभिनंदन.

अतिशय सुन्दर गझल! सगळे शेर कसे एकमेकाला छान तोलताहेत. याला म्हणावी चांगली गझल. खूप छान.

ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो 

हा बघ येथे मी प्राणाला जाळीत बसलो

मतला  आवडला. जाळत ,ठेचाळत  वाले  शेर  आवडले.

धन्यवाद सर्वांना..

विशेष आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या

 

वा...छान्...दोन्ही शेर आवडले

-----------------------

सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो 


ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो 

सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो

प्रिय मित्र केदार,
उत्तम झाली गझल!
तिलकधारी भारावून गेला.

पाचच पण चांगले शेर लिहिलेत. आनंद वाटला.
(तसा मी फारसा बोलत नाही.)

शेवटचा शेर मस्त !

दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो .... मस्त द्विपदी
-मानस६

धन्यवाद, सर्वांना.