घनश्याम धेंडेंची गझल


कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे


ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे


बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे


हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे


जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे

प्रतिसाद

जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे..क्या बात है!!!!
-मानस६

गझल आहे!
शेवटचे २ शेर तर कळस आहेत!! वा वा!

अगदी मस्त गझल आहे. सगळेच शेर आवडले. कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे.....क्या बात है.

अप्रतिम! खूप काळानंतर एक छान गझल पहायला मिळाली. "विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही" असं भट म्हणाले होते. एक वीज इथं चमकलेली दिसली. धन्यवाद!

प्रश्नच नाही ! गझल लाजवाब आहेच. ओलेतीची कवी-कल्पना, काहिली आवडले...

माफ करावे; पण 'फूलपाखरी' हा शब्द खटकतो. नवीन विशेषण म्हणून नाही, पण 'फू' तील दीर्घ उकार गरज भागविण्यासाठी म्हणून पचवावा लागतो. मराठी गझलेची हीच तर रंजक अशी अडचण आहे...
एकूणात गझल बाकी सुंदरच. धन्यवाद, समीर
 
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

 
वा.......सुन्दर
शेर आवडला....
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे

 
वा.......सुन्दर
शेर आवडला....
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे

मतल्यातील  दुसरी  ओळ  मला  नीट  समजली  नाही---
पण  बाकी  पुर्ण  गझल  मनाला  चिंब  भिजवून  गेली.
कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे
ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे
बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे
हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे