घनश्याम धेंडेंची गझल
कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहेओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहेबोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहेहात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहेजन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
मानस६
मंगळ, 16/10/2007 - 18:12
Permalink
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे..क्या बात है!!!!
-मानस६
पुलस्ति
मंगळ, 16/10/2007 - 18:49
Permalink
जबरदस्त
गझल आहे!
शेवटचे २ शेर तर कळस आहेत!! वा वा!
चित्तरंजन भट
मंगळ, 16/10/2007 - 19:17
Permalink
वाव्वा!
अगदी मस्त गझल आहे. सगळेच शेर आवडले. कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे.....क्या बात है.
गणेशप्रसाद
गुरु, 25/10/2007 - 16:12
Permalink
गझल
अप्रतिम! खूप काळानंतर एक छान गझल पहायला मिळाली. "विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही" असं भट म्हणाले होते. एक वीज इथं चमकलेली दिसली. धन्यवाद!
संतोष कुलकर्णी
रवि, 28/10/2007 - 11:14
Permalink
सुंदर
प्रश्नच नाही ! गझल लाजवाब आहेच. ओलेतीची कवी-कल्पना, काहिली आवडले...
माफ करावे; पण 'फूलपाखरी' हा शब्द खटकतो. नवीन विशेषण म्हणून नाही, पण 'फू' तील दीर्घ उकार गरज भागविण्यासाठी म्हणून पचवावा लागतो. मराठी गझलेची हीच तर रंजक अशी अडचण आहे...
एकूणात गझल बाकी सुंदरच. धन्यवाद, समीर
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
दशरथ यादव (not verified)
शनि, 10/01/2009 - 17:23
Permalink
गझ्ल
वा.......सुन्दर
शेर आवडला....
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे
दशरथ यादव (not verified)
शनि, 10/01/2009 - 17:24
Permalink
गझ्ल
वा.......सुन्दर
शेर आवडला....
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे
सुनेत्रा सुभाष
रवि, 11/01/2009 - 10:41
Permalink
अप्रतिम गझल
मतल्यातील दुसरी ओळ मला नीट समजली नाही---
पण बाकी पुर्ण गझल मनाला चिंब भिजवून गेली.
कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे
ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे
बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे
हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे