दिवाळी विशेषांक २००८

विशेषांकाबद्दल चार शब्द...

गझलरसिकहो,
नमस्कार

मराठी गझलेला वाहिलेला हा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे अंक वेळेवर - म्हणजे ऐन दिवाळीत - प्रकाशित करता येऊ शकला नाही, त्याबद्दल खेदही होत आहे. वाचकांची त्यामुळे गैरसोय झाल्याने मनापासून क्षमा.

मराठी गझलेसमोरची वाट आज खूपच विस्तृत झालेली आहे. ताज्या दमाचे गझलकार ज्या प्रकारची गझल लिहीत आहेत, ते पाहता या विधानातील सत्यता पटावी. या रुंदावलेल्या वाटेवरून गझलेची डौलदारपणे आगेकूच सुरू आहे...पण याच वेळी या गझलेने आपला तोलही तेवढ्याच कौशल्याने सांभाळायला हवा. आपली पावले योग्य त्याच दिशेने पडत आहेत ना, हे पाहायला हवे. विशेषतः गझल नुकतीच लिहू लागलेल्या गझलकारांनी ही बाब कटाक्षाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

या दिवाळी अंकात एकूण २८ गझलांचा समावेश आहे. हे चित्र प्रातिनिधिक नसले तरी मराठीत आज कशा प्रकारची गझल लिहिली जात आहे, त्याची कल्पना या गझलांमधून यायला हरकत नाही.

या अंकात कविवर्य सुरेश भट यांच्या आठवणी जागविणाऱ्या तीन लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. माणूस म्हणून, कवी म्हणून ते कसे होते, याविषयीची माहिती या लेखांमधून जिज्ञासूंना मिळेल.

केवळ मराठी गझलेला वाहिलेल्या या अंकाचे गझलरसिक मनापासून स्वागत करतील, अशी खात्री आहे.

प्रतिसाद

राम राम
मि कुनाल , मराटवाड्यातला ,तसी माझ्या मुलखाकाला साहित्यकांचि देणगि आहे.
मला कविता ़़़़खुप आवडतात्,योगायोगाने माझ्या हाति सुरेश भटांचा गजल संग्रह लागला
आणि बस, तेंव्हा पासुन भटांचा  इतका चाहता झालो कि विचारु नका
आणि ह्या संकेत स्थळाचा आभारि आहे.
ह्यामुळे माझ्या मुल्खातिल दमदार कविंना व्यासपिट मिळेल.
लवकरात लवकर मि माझ्या जवळाचे मित्र आणि एक जातिवंत कवि गणेश बेरगुडे
यांचि ओळ्ख करुन देइल.
राम राम.