असे कसे ते मधेच घडते?
Posted by चमत्कारी on Friday, 7 November 2008
असे कसे ते मधेच घडते? दोष असावा काही बाही
आत्ता वाटे 'शायर आहे' आत्ता वाटे नाही नाही
करा पसारे, असे करा पण, देवा स्वतःसही समजावे
मानव म्हणतो अर्थ असा अन तुम्ही म्हणावे "नाही काही?"
'लिहीत नाही नशीब जोवर देव आमचे' सुखात आम्ही
सुचले त्याला लिहायचे की सुरू आमचे " त्राहि त्राही"
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत चालले जीवन आता
निमिषार्धाच्या ठिणगीनेही होते ज्यांची लाही लाही
असे जगा मित्रांनो येथे जीवन उधळो जीव तुम्हावर
मृत्यू तुमचा दिसता त्याला पुढे होत सरसावुन बाही
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 10/11/2008 - 12:02
Permalink
त्राहि त्राही
सन्माननीय चमत्कारी,
या त्राहि त्राही मधे आपण 'ही' या अक्षराला लघु व गुरू अशा दोन्ही स्वरुपात मांडुन मराठी शब्दकोषात जी अमुल्य भर टाकली आहेत ती प्रशंसनीय आहे.
शेवटचा शेर बरा आहे.
ज्ञानेश.
सोम, 10/11/2008 - 12:51
Permalink
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत चालले जीवन आता..
चांगली गझल आहे.
मक्ता तर खासच.
का कुणास ठावूक, आमचे परममित्र 'तिलकधारी' यांची प्रकर्षाने आठवण येते आहे...
अजय अनंत जोशी
सोम, 10/11/2008 - 22:45
Permalink
ठीक..
समजण्यासारखी. ही .. ही .. ही...
कलोअ चूभूद्याघ्या
कौतुक शिरोडकर
मंगळ, 11/11/2008 - 11:50
Permalink
शेर
'लिहीत नाही नशीब जोवर देव आमचे' सुखात आम्ही
सुचले त्याला लिहायचे की सुरू आमचे " त्राहि त्राही"
शेर छान, बाकी खोलात जात नाही.
चमत्कारी
बुध, 12/11/2008 - 12:29
Permalink
प्रिय मित्र ज्ञानेश!
प्रिय मित्र ज्ञानेश,
आम्ही पूर्वी जत्रेत हरवलो होतो.
भूषण कटककर
गुरु, 13/11/2008 - 11:31
Permalink
यादों की बारात
ज्ञानेशजी,
मला वाटते आहे की बहुतेक यादों की बारात पिक्चर चालू आहे.
तीन नावे साधारण सारखीच वाटतात नाही?