तू

तू

बोलशी खोटे जरी तू
दे दिलासे मज तरी तू

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू

यातने गोंजारले मी
मागल्यापेक्षा बरी तू

भाग्य भाळी, रेघ हाती
हे खरे का ही खरी तू ?


वेदना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू


धीर दे दु:खास जात्या
सल बनून मित्रा उरी तू

काल ते अन आजचे हे
सांधशील कसा दरी तू ?


तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू

जी क्षणी बदलेल जग हे
बोल गझले, ती परी तू

बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू


गझल: 

प्रतिसाद

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

सरी, अरी, खरी हे  शेर सुरेख जमले आहेत. बाकीचेही  ठीक.
सांधशील कसा दरी तू ? ही ओळ  तपासावी.
शुभेच्छा..!
 

यातने मागल्यापेक्षा बरी तू. फार सुंदर विचार आहे. छान छोटीशी गझल.

प्रतिसादाबद्द्ल आभार.

मनातले भावः तिला कलले असते
तर शब्द जोलावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता
जग सोडावे लागले नसते

महेश राउत नॉट व्हेरिफाईड यांनी जे लिहिले आहे ते काय आहे? प्रतिसाद आहे की त्यांना सुचलेल्या ओळी आहेत?

हे  महेश  राउत यांच्या चिरंजीवाचे  "चिमखडे  बोल" असावेत...!  :D

तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू

बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू
कलोअ चूभूद्याघ्या