तू
तू
बोलशी खोटे जरी तू
दे दिलासे मज तरी तू
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू
यातने गोंजारले मी
मागल्यापेक्षा बरी तू
भाग्य भाळी, रेघ हाती
हे खरे का ही खरी तू ?
वेदना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू
धीर दे दु:खास जात्या
सल बनून मित्रा उरी तू
काल ते अन आजचे हे
सांधशील कसा दरी तू ?
तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू
जी क्षणी बदलेल जग हे
बोल गझले, ती परी तू
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 23/10/2008 - 15:36
Permalink
चांगला शेर
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
ज्ञानेश.
गुरु, 23/10/2008 - 16:47
Permalink
कौतुकास्पद..!
सरी, अरी, खरी हे शेर सुरेख जमले आहेत. बाकीचेही ठीक.
सांधशील कसा दरी तू ? ही ओळ तपासावी.
शुभेच्छा..!
भूषण कटककर
शनि, 25/10/2008 - 14:36
Permalink
गुड.
यातने मागल्यापेक्षा बरी तू. फार सुंदर विचार आहे. छान छोटीशी गझल.
कौतुक शिरोडकर
बुध, 05/11/2008 - 16:28
Permalink
आभार
प्रतिसादाबद्द्ल आभार.
महेश राउत (not verified)
गुरु, 06/11/2008 - 13:19
Permalink
सहज
मनातले भावः तिला कलले असते
तर शब्द जोलावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता
जग सोडावे लागले नसते
भूषण कटककर
शुक्र, 07/11/2008 - 10:59
Permalink
हे काय?
महेश राउत नॉट व्हेरिफाईड यांनी जे लिहिले आहे ते काय आहे? प्रतिसाद आहे की त्यांना सुचलेल्या ओळी आहेत?
ज्ञानेश.
शुक्र, 07/11/2008 - 11:08
Permalink
मला वाटते..
हे महेश राउत यांच्या चिरंजीवाचे "चिमखडे बोल" असावेत...! :D
अजय अनंत जोशी
शुक्र, 07/11/2008 - 17:19
Permalink
व्वा!
तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू
कलोअ चूभूद्याघ्या