...नकोशा रात्री !
...नकोशा रात्री !
टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?
अंगावर कोसळतात नकोशा रात्री... !
दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !
बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...
वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री !मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...?
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा....!
...गालांवर ओघळतात नकोशा रात्री !आहेत जणू या पिंपळ आठवणींचे...
डोक्यावर सळसळतात नकोशा रात्री !यांच्यावरती उपचारच नाही आता -
जखमांसम भळभळतात नकोशा रात्री...!सोसून असे हे कुठवर सोसायाचे...?
निःशब्दच तळमळतात नकोशा रात्री !थांबेल कुठे ही आग...कशी अन् केव्हा...?
विझतात...पुन्हा जळतात नकोशा रात्री !कोलाहल वा गलका न, जराही दंगा...
मज शांतपणे छळतात नकोशा रात्री...!!
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 17/06/2007 - 16:24
Permalink
असे वाचावे...
नवव्या शेरातील पहिली ओळ अशी वाचावी ः
थांबेल कुठे ही आग...कशी अन् केव्हा...?
चित्तरंजन भट
सोम, 18/06/2007 - 01:52
Permalink
वाव्वा!
संपूर्ण गझल फार आवडली. सुंदर, सफाईदार.
प्रज्ञा
सोम, 18/06/2007 - 01:53
Permalink
अत्तिशय सुंदर
गजल अत्तिशय सुंदर.
कुमार जावडेकर
सोम, 18/06/2007 - 18:29
Permalink
वा! वा! वा! (हव्याश्या रात्री..)
प्रदीप,
अप्रतिम गझल...सगळेच शेर सुंदर आहेत..(... हव्याश्या रात्री!)
दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !.. वा!
आणि मक्त्यातल्या शांतपणे छळणार्या रात्रीही आवडल्या.
- कुमार
सोनाली जोशी
बुध, 20/06/2007 - 18:34
Permalink
वा!
सोसून चा शेर सर्वाधिक आवडला. मक्ता सुंदरच आहे. मस्त गझल!
मानस६
बुध, 20/06/2007 - 23:22
Permalink
रसरशीत गझल
अतिशय आशयघन, रसरशीत गझल!!
आतून परि खळबळतात नकोशा रात्री !..असे केल्यास..?
बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...
वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री ! ..मस्तच!
डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा....!
...गालांवर ओघळतात नकोशा रात्री ! ..बढीया! ..गुलझारांची 'आखोमे जल रहा है क्यू..' ही गझल आठवली.
सोसून असे हे कुठवर सोसायाचे...?
निःशब्दच तळमळतात नकोशा रात्री !
थांबेल कुठे ही आग...कशी अन् केव्हा...?
विझतात...पुन्हा जळतात नकोशा रात्री !... वा!
कोलाहल ,गलका, वा न, जराही दंगा...अए केल्यास अधिक ओघ येईल असे वाटते.
-मानस६
अजब
शुक्र, 22/06/2007 - 13:58
Permalink
वा!
गजल आवडली. मतला आणि शेवटचे २ शेर विशेष आवडले.
पुलस्ति
शुक्र, 22/06/2007 - 19:25
Permalink
वाहवा!
दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !
वा! पूर्ण गझल आवडली!!
-- पुलस्ति.
धोंडोपंत
शुक्र, 22/06/2007 - 21:44
Permalink
वा वा प्रदीपराव
वा प्रदीपराव,
अजून एक अप्रतिम ग़ज़ल पेश केल्याबद्दल आभार . सर्व शेर आवडले. उल्लेख कशाचा करावा?
यांच्यावरती उपचारच नाही आता -
जखमांसम भळभळतात नकोशा रात्री...!
वा वा ! हेच आमच्या जीवनाचे वास्तव.
आपला,
(दु:खविलासी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
प्रदीप कुलकर्णी
शनि, 23/06/2007 - 14:43
Permalink
सर्वांचे मनापासून आभार...!
दाद-प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...!
शशांक
गुरु, 05/07/2007 - 18:43
Permalink
असेच
असेच म्हणतो. उत्कृष्ट गझल, सर्वच शेर आवडले.
चांदणी लाड.
शनि, 25/10/2008 - 11:57
Permalink
सारेच शेर मनाला भिडणारे.....
प्रदीपजी,
सारेच शेर मनाला भिडणारे.....
सोसून असे हे कुठवर सोसायाचे...?
निःशब्दच तळमळतात नकोशा रात्री !
हा शेर तर खासच...
प्रवासी (not verified)
सोम, 27/10/2008 - 17:02
Permalink
वा
वा! प्रदीपराव. अतिशय सुंदर गझल.
मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...?
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !
वा
डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा....!
...गालांवर ओघळतात नकोशा रात्री !
वा वा
कोलाहल वा गलका न, जराही दंगा...
मज शांतपणे छळतात नकोशा रात्री...!!
वा वा वा
आपला
(चाहता) प्रवासी
अजय अनंत जोशी
शुक्र, 07/11/2008 - 10:01
Permalink
एकसे एक
एकसे एक बढकर. खूपच छान.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 07/11/2008 - 11:26
Permalink
मि. प्रदीप,
मि. प्रदीप,
आपल्याला योग्य वाटल्यास एका गोष्टीवर मार्गदर्शन करावेत अशी विनंती:
खालील शेरांमधे बेसिकली एकच मुद्दा आहे असे वाटते.
टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?
अंगावर कोसळतात नकोशा रात्री... !
हाकलतो...पण लोचट जाती कोठे...?
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !
तसेचः
बाकीच्या शेरांमधेही मुळात कुठलीतरी कॉमन भावना आहे व ती परत परत येतीय असे वाटते.
आपल्या श्रेष्ठत्वाचा पूर्ण आदर ठेवून मला असे म्हणायचे आहे की ही गझल वारंवारतेच्या जाळ्यात गेली आहे ( आशयाच्या दृष्टीने ) असे वाटते.
हे मत योग्य आहे का व असल्यास असे होऊ नये म्हणुन काय केले पाहिजे हे मला विचारायचे आहे. कारण मी एखादी ( तथाकथित ) गझल रचताना स्वतः काफिया मिळाला की शेर रचण्याचा मोह टाळत नाही. मात्र आपण मात्र एका प्रतिसादात ( कुणाला लिहिला होता ते आठवत नाही पण ) असे म्हंटला होतात की आपण आपल्याला न आवडणारे शेर निर्दयपणे फेकून देता.
आपला गैरसमज होणार नाही अशी आशा आहे.
धन्यवाद!
कौतुक शिरोडकर
शनि, 08/11/2008 - 11:27
Permalink
सर्व
सर्व वाचल्यात. आता प्रिंट करून संग्रही ठेवणार आहे.