तयारी...



करा माणसे जोडण्याची तयारी
दुरावे पुन्हा तोडण्याची तयारी

यशाची असे भूक त्यांची निराळी
खरे बोलणे सोडण्याची तयारी...!

दिसे नाव यादीत पहिलेच माझे..;
तरी चालली खोडण्याची तयारी...!

कुणाच्या पुढे वाकण्याचा न बाणा
मनाची जरी मोडण्याची तयारी..!

गरीबीमुळे एक वरदान लाभे..,
पहाडासही फोडण्याची तयारी..

कशाची करी रोज घरदार घाई..?
जणू गावही सोडण्याची तयारी...!

सदा राखतो मी मनी दांभिकांना..
पुराव्यानिशी झोडण्याची तयारी...

-- संतोष कुलकर्णी


प्रतिसाद

खोडणे, फोडणे व झोडणे हे उत्तम शेर आहेत.

जबर शेर-

"सदा राखतो मी मनी दांभिकांना..
पुराव्यानिशी झोडण्याची तयारी..."

गझल  आवडली.

कुणाच्या पुढे वाकण्याचा न बाणा
मनाची जरी मोडण्याची तयारी..!
वाह !! हा शेर खुप आवडला..

सदा राखतो मी मनी दांभिकांना..
पुराव्यानिशी झोडण्याची तयारी...

शेर असावा तर असा....

झोडण्याची आणि फोडण्याची हे शेर अतिशय आवडले!

मनापासून...........
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

दिसे नाव यादीत पहिलेच माझे..;
तरी चालली खोडण्याची तयारी...!
सुं  द  र ...!

कुणाच्या पुढे वाकण्याचा न बाणा
मनाची जरी मोडण्याची तयारी..!
छान... ( `मन मोडणे ` या वाक्प्रचारात जो अर्थ अभिप्रेत असतो, त्या अर्थ घेऊन हा शेर आला असता, तर वेगळीच बहार आली असती.  जो आहे, तो शेरही छानच.)

कशाची करी रोज घरदार घाई..?
जणू गावही सोडण्याची तयारी...!

वा...वा...