भेट चोरटी...
=====================
आज तू खुशाल गाल लाल होत जाउदे,
भेट चोरटी जरा 'जहाल' होत जाउदे...
रोज मंद गंध होत अंतरंग व्यापतो,
आज अंग माखण्या गुलाल होत जाउदे
ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !!
देह लोळतो किती सुखात साजणे तुझा,
हे न फार चांगले, तु 'हाल' होत जाउदे...
स्वप्न्-बिप्न सोड, आज थेट भेट नेटकी..
सारखी पुढेच वाटचाल होत जाउदे..
रोज रोज काय तेच गोड गोड बोलणे?
तू कधी कधी अशी धमाल होत जाउ दे..!
तोलतात शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल गालगा"त चाल होत जाउदे..!!
=====================
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 14/10/2008 - 19:32
Permalink
ठेवणीतला
ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !!
वा ;)
तोलतात शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल गालगा"त चाल होत जाउदे..!!
:)
रोम्यांटिक आणि किंचित हझलिश (किंवा मिष्किल) गझल आहे एकंदर
भूषण कटककर
मंगळ, 14/10/2008 - 19:57
Permalink
जायची नोंद!
चांगली जायची नोंद केली होती! तुमच्या या गझलेमुळे परत यावे लागले. अप्रतिम! रुमाल, हाल अन धमाल सॉलीड! 'गालगाल गालगा' उच्च!
भूषण कटककर
मंगळ, 14/10/2008 - 20:00
Permalink
जहाल
मतला पण बेस्ट. एकदम जहाल. मला असे वाटते की आपण 'तू गाल' च्या ऐवजी 'हे गाल' किंवा 'ते गाल' करावेत. एनी वे. गझल अशी आहे की असले काही सुचवायलाच नको वाटते.
किशोर पाटील
मंगळ, 14/10/2008 - 22:02
Permalink
गझल
कोजगिरीच्या चा॑दण्यात हेच शब्ध येतील.
अजय अनंत जोशी
मंगळ, 14/10/2008 - 22:27
Permalink
रुमाल होत जाउदे
ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !!
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारीकाका
मंगळ, 14/10/2008 - 22:51
Permalink
गप्प.
ही गझल नाही.
मी गप्प आहे.
पुलस्ति
बुध, 15/10/2008 - 00:13
Permalink
रुमाल
मस्तच शेर आहे हा ज्ञानेश! अभिनंदन...
ज्ञानेश.
बुध, 15/10/2008 - 12:52
Permalink
आभार...
@चित्तरंजन सर, भुषण, अजय, पुलस्ति... सर्वांचे आभार मानतो.
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 21:31
Permalink
दागिना
ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !!हा शेर आवडला.
बाकी शेरांना वाखाणतायेईल असे काही कारण सापडत नाही.
चांदणी लाड.
शुक्र, 17/10/2008 - 11:36
Permalink
रोज रोज
रोज रोज काय तेच गोड गोड बोलणे?
तू कधी कधी अशी धमाल होत जाउ दे..!
तोलतात शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल गालगा"त चाल होत जाउदे..!!
हे शेर आवडले...
मानस६
रवि, 19/10/2008 - 22:37
Permalink
मतला..
आज तू खुशाल गाल लाल होत जाउदे,
भेट चोरटी जरा 'जहाल' होत जाउदे... वा सही
-मानस६