पडसाद
सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा; आसवांची दाद आहे
मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे
एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे!"
बंगले बांधा तुम्ही पण झोपड्यांमध्येच का रे?
...बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे
देवधर्माने जगी होतेच की काही भले, पण -
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?
गझल:
प्रतिसाद
चक्रपाणि
शनि, 09/08/2008 - 05:44
Permalink
संदिग्ध
पुलस्ति,
फुलाचा शेर फारच आवडला. व्वा! पण बाकीच्या शेरांमध्ये शेरांच्या दोन ओळींचा परस्परसंबंध काहीसा अशक्त झालाय,असे वाटले आणि त्यामुळे शेर अस्पष्टसे वाटले. बापजाद्यांच्या दौलतीचा उन्माद त्यातही समजला,पण इतर शेर जरा अवघडच गेले. चू. भू. द्या. घ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
पुलस्ति
शनि, 09/08/2008 - 07:35
Permalink
बदल
धन्यवाद चक्रपाणि. काही मामूली बदल केले आहेत. अजूनही काही सुचली तर सुधारणा करीन...
चक्रपाणि
शनि, 09/08/2008 - 12:51
Permalink
हे कसे वाटेल?
बंगले बांधा तुम्ही! पण झोपड्यांवरती कशाला? हे कसे वाटेल? (झोपडपट्ट्या हटवून/झोपड्या पाडून त्या जागी टावर्स उभारणे असे सुचवणे) त्यातून पुढच्या ओळीतला बापजाद्यांच्या दौलतीचा उन्माद अधिक स्पष्ट होईल का/ना? झोपड्यांमध्येच बंगले बांधण्यातून माज जाणवेल पैशाचा,पण झोपड्यांवरती बंगले बांधण्यातून तो ठळकपणे अधोरेखित होईल,असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
कुमार जावडेकर
रवि, 10/08/2008 - 19:03
Permalink
वा!
पुलस्ति,
गझल आवडली.
मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे .... हा शेर विशेष आवडला.
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?... हा शेरही आवडला. शुद्धलेखनात बसवण्याच्या दृष्टीनं 'नियमांत' असं वापरलं तर?
- कुमार
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 12/08/2008 - 09:41
Permalink
चांगली ओळ
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे...
चक्रपाणि शी काही प्रमाणात सहमत...