..मी कुठे काही म्हणालो ?
...गझल...
त्याच रीती , त्याच चाली , मी कुठे काही म्हणालो ?
तेच ओझे , ती हमाली , मी कुठे काही म्हणालो ?
वाढते वय धावते माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगती ह्या हालचाली , मी कुठे काही म्हणालो ?
मजवरी होत्या परजल्या आज तलवारी, तरी तू
ठेविल्या लपवून ढाली , मी कुठे काही म्हणालो ?
शुभ्र खादीचे कवच अन कुंडले धारण करोनी ,
भाषणे देती मवाली , मी कुठे काही म्हणालो ?
"आपुली ही प्रीत ,सजणा, जन्मजन्माचेच नाते",
तीच हे सारे म्हणाली , मी कुठे काही म्हणालो ?
...शॅलेश कुलकर्णी.
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 13/07/2008 - 18:03
Permalink
उत्तम...
त्याच रीती , त्याच चाली , मी कुठे काही म्हणालो ?
तेच ओझे , ती हमाली , मी कुठे काही म्हणालो ?
वा...वा...
वाढते वय धावते माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगती ह्या हालचाली , मी कुठे काही म्हणालो ?
उत्तम...
छान लिहीत आहात तुम्ही शैलेशराव. तंत्रदृष्ट्या आणि मंत्रदृष्ट्याही. लिहीत राहा.
शुद्धलेखनाची ओढाताण (आधीच्या गझलेतील तपासुन हा शब्द), जुन्या धाटणीची भाषा टाळता आल्यास अधिक बरे... (या गझलेतील करोनी हा शब्द). [आग्रह नाही. :) ]
असे केल्याने बिघडत काहीच नाही, पण रचनासौंदर्य उणावू शकते. असो.
चक्रपाणि
सोम, 14/07/2008 - 00:48
Permalink
सहमत
प्रदीपजींशी सहमत आहे.गझल आवडली.मतला सगळ्यात जास्त आवडला.वाढते वयही आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
शैलेश कुलकर्णी
सोम, 14/07/2008 - 11:10
Permalink
धन्यवाद.
प्रदीपजी/ चक्रपाणिजी,
मार्गदर्शनासाठी धन्यवाद.
आजवरचे संपूर्ण शिक्षण हिन्दी व उर्दू माध्यमात झाल्यामुळे मराठी भाषेवर मर्यादित प्रभुत्च मिळवूशकलो आहे. मनापासुन प्रयत्न करीत आहे. आपले असेच मार्गदर्शन लाभल्यास माझी वाटचाल योग्य दिशेनं होईल. पुनश्च आभार.
-शॅलेश कुलकर्णी.
हिन्दीतल्या दोन स्वरचित ओळी प्रस्तुत करतो-
"अपने स्पर्श का इक छूटा कण बन, मेरे तन झूल गई हो ,
तुम कल रात मेरे हाथों में अपना यॉवन भूल गई हो "
योगेश वैद्य
सोम, 14/07/2008 - 19:59
Permalink
तुमची
गझल आणि या हिंदी ओळीही आवडल्या,शैलेशराव.
शुभेच्छा!
पुलस्ति
मंगळ, 15/07/2008 - 20:08
Permalink
वा!!
स्वागत शैलेश! गझल आवडली.
धापा हा शेर तर फार फार मस्त आहे.
सतीश
बुध, 16/07/2008 - 12:59
Permalink
सुंदर!
शैलेशजी,
गजल आवडली. विशेषतः हा शेर खूपच !
मजवरी होत्या परजल्या आज तलवारी, तरी तू
ठेविल्या लपवून ढाली , मी कुठे काही म्हणालो ?
वा!
-सतीश