व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे...!


मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?

यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !

नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !

ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !

आयता बसशील आयुष्या किती तू ?
ऊठ आता, मौज सायासात आहे !

खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !

ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)

भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!

राम नाही राहिला माझ्यात आता...
मी कधीपासून वनवासात आहे !

काव्य दोघांना सुचावे...नवल नाही...!
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

अरे बापरे! जबराट! आणि काय?
कुलकर्णीसाहेब, एक क्लीन-बोल्ड गझल!!!
अगदी भन्नाट...
प्रत्येक शेर अ फा ट

नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !
भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!... हे शेर विशेष आवडले.

अजब

क्या बात है!!! 

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?


भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!


राम नाही राहिला माझ्यात आता...
मी कधीपासून वनवासात आहे !

हे शेर तर जबरदस्त !!!

नितांतसुंदर गझल प्रदीपजी!!
सायास, उल्हास, कंस आणि व्यास हे शेर तर अप्रतिम!! क्या बात है! 
कंसात मिसरा लिहिण्याच्या पद्धतीबद्दल मला जराशी अढी आहे. मी माझे म्हणणे एक-दोन ठिकाणी मांडलेही आहे. पण (वाच आता नीट...मी कंसात आहे !!) हा मिसरा कंसात अगदी अगदी चपखल बसतो!! वा वा!!

एक ना एक कातिल शेर..! अगदी निशब्द..!!

..........................................................
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे...!
............................................................
मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?

यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !

नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !

ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !

आयता बसशील आयुष्या किती तू ?
ऊठ आता, मौज सायासात आहे !

खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !

ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)
भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!

राम नाही राहिला माझ्यात आता...
मी कधीपासून वनवासात आहे !

काव्य दोघांना सुचावे...नवल नाही...!
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे !!
.............अमित वाघ. (sorry)

 ही गझल माझी का नाही....
बहोत.. बहोत... बहोत.... बढीया.....
एवढी चां़गली गझल सुरेश भट.इन पहिल्यांदाच वाचायला मिळाली...
खूप खूप आवडली....

ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)

काव्य दोघांना सुचावे...नवल नाही...!
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे !!...  मस्त कल्पना विलास
-मानस६

प्रदिपजी,
नेहमीप्रमाणेच एक उत्तम गजल दिलीत आम्हाला वाचायला...
सर्वच शेर झकास
त्यातही
हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?
ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !

भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!
फार आवडले..

अप्रतिम गझल. प्रदीपराव हार्दिक अभिनंदन.
आपला,
(भारावलेला) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वा वा वा बहोत खूब.
अप्रतिम गझल. नेहमीप्रमाणेच अतीव सुंदर. प्रत्येक शेर मस्त झालाय.
अगस्ती

मनोज्ञ गझल

आमित च्या मताशी  सहमत आहे आजुन काहीच बोलो शकत नाही


व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !

आयता बसशील आयुष्या किती तू ?
ऊठ आता, मौज सायासात आहे !

खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !

ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)
भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!


 क्या बात है! मजा आली ....
-अमोल शिरसाट,
संवेदना रायटर्स कम्बाईन,
मिलिंद विद्यालय,कमला नगर, वाशिम रोड ,बायपास अकोला. भ्रमणध्वनी क्रं ९९२२६४६००२
(भेटा: http://amolshirsat.blogspot.com/
            http://wamandadakardak.blogspot.com/)

गझल अतिशय आवडली. खासकरून पुढील शेर.
व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !


नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !
क्या बात है!

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

वा,  बुवा वा! क्या बात है !

प्रदीप, मस्त गझल , क्या बात है!

संशयाचा रंग विश्वासात आहे !हा शेर मस्तच!

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !
हे सुद्धा खूप आवडले.

यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?
हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?
वरील ३ ओळीत खुप काही अर्थ दडलाय . जबरदस्त  खुप छान ! शब्दा मधे वर्णन नाही करत येणार . 
Shailesh <?XML:NAMESPACE PREFIX = SKYPE /?>9422870211

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !
ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !
हे शेर विशेश्,अप्रतिम

अप्रतिम गझल. प्रत्येक शेर सुरेख आहे.

तुम्ही व्यासात आहे फेम म्हणून ओळखले जाणार
बहुतेक,
 
फार फार फार आवडली.
--योगेश.

मस्त मजा आली वाचायला.

अभारी आहे .........
कंसात ठेऊन,
माझीच मला भेट करुन दिल्या बद्द्ल.
राहुल जे.
 

हजार वार 'वा, वा'. फारच सुंदर. भासात, विश्वासात, इतिहासात, व्यासात तर लाजवाबच!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

खालील शेर खल्लास आहेत. मी ही एक अत्यंत महत्वाची गझल मानतो. कारण एक तर मूड्स विविध आहेत. वर आशय सर्वसमावेशक आहे. म्हणजे अनेक जणांच्या व्यथा यात मांडल्या जातात. बर्‍याच जणांना व्यक्त झाल्यासारखे वाटेल. मात्र, ग्लास हा शेर मला बरोबर वाटत नाही कारण तो इंग्लीश भाषेवर विसंबून आहे.
मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !
नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !
खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !

भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!
 

मंगळ, 08/26/2008 - 19:24 — चित्तरंजन भट

माझा प्रतिसाद

सहज सांगतात दोष सारखे मला
करत राहतात लोक पारखे मला

दोन ओळींतला संबंध कळला नाही. कृपया समजावून सांगाल काय?

वलय आखतात आखतात वर्तुळे
टाकताच पाय बोचती नखे मला
छान

वाटणी समान जाहलीशी वाटते
स्वर्ग त्यास लाभले नी दोजखे मला

दोजख हा उर्दू शब्द आहे. दोजखे  मराठीत वापरणे योग्य ठरणार नाही. चूक भूल द्या घ्या.



माझी वाट पाहते समजताच मी
पाहते अशी जशी न ओळखे मला
वरची ओळ लयीत गुणगुणताना, बोलताना अडचण होते आहे.

नाजुकी तुझी फुलाहुनी अधीक तर
सांग माळतेस का फुले सखे मला
नेहमीचे. पण छान.  मला हे रदीफ असे आले आहे की सखी कवीला फुले माळत असावी असे वाटावे.

पळभरी सुखात गुंतलो मी पाहुनी
दु:ख शोधण्यास काय वखवखे मला
छान...
वरील सर्व वाचून मला असे वाटायला लागले आहे की ज्याला गझल जशी वाटते तशी गझल असते.

आज पुन्हा ही गझल वाचली. वा! क्या बात है. माझा रिता तुझा ओसंडलेला...खट्याळ अर्थ उमगला.. जरा उशीराच म्हणा..:)
सोनाली