तमाशा
एकटेपण मागता का?
अन स्वतःला टाळता का?
हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?
"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?
मार्ग चुकला! व्यर्थ आता
या दिव्याला राखता का?
जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?
गझल:
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
एकटेपण मागता का?
अन स्वतःला टाळता का?
हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?
"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?
मार्ग चुकला! व्यर्थ आता
या दिव्याला राखता का?
जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?
प्रतिसाद
जयन्ता५२
बुध, 31/10/2007 - 08:53
Permalink
वा!
पुलस्ति,
सलाम कुबूल फरमाइये! बढिया!
नम्र विनंती:
हा तमाशा येवढ्यात संपवू नका,आम्ही रेंगाळायला तयार आहोत! आणखी शेर येऊ द्या.
जयन्ता५२
चक्रपाणि
बुध, 31/10/2007 - 12:04
Permalink
सहमत आहे
[quote=जयन्ता५२]हा तमाशा येवढ्यात संपवू नका,आम्ही रेंगाळायला तयार आहोत! आणखी शेर येऊ द्या.
[/quote]
सहमत आहे पुलस्ति. चांगली झाली आहे गझल. आणखी काफिये गुंफता आले मनासारखे तर पहा
- चक्रपाणि जीवन चिटणीस
चित्तरंजन भट
बुध, 31/10/2007 - 14:24
Permalink
वा!!
हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?
वा!! मतला आणि 'तमाशा'ही विशेष. एकंदर गझल आवडली.
संतोष कुलकर्णी
बुध, 31/10/2007 - 15:53
Permalink
वा!
छान ! मला -
मार्ग चुकला .. हा शेर फार आवडला. त्यातील गर्भितार्थ भावला. कल्पनाही छान आहे. एकूण गझल आवडली. मी रेंगाळायला तयार नाही. लवकरात लवकर अजूनही गझला येवू द्या. घाई न करता, याही गझलेचे अनेक काफिये (त्यांचे त्यांना) येवू द्या. अभिनंदन!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
प्रदीप कुलकर्णी
बुध, 31/10/2007 - 20:22
Permalink
जोरदार...
हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?
"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?
जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?
पुलस्ती,
मला वरील तीन शेर फार आवडले...तमाशा तर अप्रतिमच. सूर्यही जोरदार...शुभेच्छा.
प्रमोद बेजकर
बुध, 31/10/2007 - 23:28
Permalink
व्वा...
सुंदर गजल. आवडली.अजुन नविन शेर या गजलमध्ये नक्की येऊ शकतील. वाट पाहतोय.
अनंत ढवळे
शुक्र, 02/11/2007 - 20:28
Permalink
व्वा !
जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?
बढिया !!
पुलस्ति
सोम, 05/11/2007 - 20:34
Permalink
धन्यवाद!
सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद!