बोचरे वारे

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे

गझल: 

प्रतिसाद

कुठल्याच साच्यातून... आणि आल्हाद नाही देत... हे दोन शेर आवडले.

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
वाव्वा विजयराव. मस्त. बाकी छानच आहे गझल.

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

उत्तम गझल, सर्व शेर चांगले झाले आहेत. या लेखनातून स्वतःची अशी ठाशीव शैली, वेगळा विचार करण्याची / मांडण्याची तयारी दिसून येते.

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

वा वा,

व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे.... हाही सुंदर

मनःपूर्वक आभार!

masta gazal aahe. vareel sarvaanshee sahamat!

आजवर तुमच्या मी वाचालेल्या पैकी मला खूप आवडणारी आणि आठवणारी गझल

आजवर तुमच्या मी वाचालेल्या पैकी मला खूप आवडणारी आणि आठवणारी गझल

मस्त
जवळपास सर्वच शेर आवडले

मस्त गझल आवड्या मला

khupach chaan

सर्वांचे आभार