जन्मभर तुडवीन मी ...
जन्मभर तुडवीन मी रस्ता उन्हाचा
पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा
पूर आला हे बरे डोळ्यात झाले
साचला होता किती कचरा उन्हाचा
मी जशी खिडकी उघडली, आत आला
केवढ्या वेगामधे तुकडा उन्हाचा
दग्ध ओठांनी तुझ्या केसांमधे मी
माळला होता कसा गजरा उन्हाचा
यामुळे तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर
रंग नाही एवढा गोरा उन्हाचा
घालतो पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा
राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा
दिवस गेला, सांज ढळली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा
- वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
शाम
गुरु, 03/02/2011 - 22:11
Permalink
नेहमी प्रमाणेच
नेहमी प्रमाणेच ....भन्नाट!!!!!!!
मयुरेश साने
गुरु, 03/02/2011 - 23:39
Permalink
काय सुरेख
काय सुरेख लिहिलिये....वाहवा
यामुळे तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर
रंग नाही एवढा गोरा उन्हाचा............कमाल कमाल
राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा...हे ही अफाटच
दिवस गेला, सांज ढळली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा...आहा हा "धुरळा उन्हाचा" हे फारच छान जमलय
अनिल रत्नाकर
शुक्र, 04/02/2011 - 00:07
Permalink
अप्रतिम
अप्रतिम
कैलास गांधी
शुक्र, 04/02/2011 - 13:33
Permalink
हिंडतो बांधून तो पटका
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा...
दिवस गेला, सांज ढळली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा
हि ओळ खुप आवड्ली...
अनेक शेरात दुसरी ओळ जास्त ताकदीची वाटते...
पहिली ओळ अधीक ताकदीची बनवता येउ शकेल असे वाटते...गझल छान आहेच अधीक छान होइल..
ज्ञानेश.
रवि, 06/02/2011 - 12:42
Permalink
अप्रतिम ! नि:शब्द केलेत..
अप्रतिम !
नि:शब्द केलेत..
चित्तरंजन भट
बुध, 09/02/2011 - 10:19
Permalink
मी जशी खिडकी उघडली, आत
मी जशी खिडकी उघडली, आत आला
केवढ्या वेगामधे तुकडा उन्हाचा
बहोत खूब.
दग्ध ओठांनी तुझ्या केसांमधे मी
माळला होता कसा गजरा उन्हाचा
वाव्वा.
घालतो पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा
वा.
एकंदर स्वरयमकांची गझल अगदी ]उत्तम झाली आहे.
बेफिकीर
मंगळ, 15/02/2011 - 19:16
Permalink
गझल आवडली. धन्यवाद!
गझल आवडली.
धन्यवाद!
अभिजीतसावंत
मंगळ, 15/02/2011 - 19:20
Permalink
राहते माझ्यासवे
राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा
अप्रतिम
वैभव देशमुख
गुरु, 17/02/2011 - 10:44
Permalink
सर्वांचे मनापासून आभार....
सर्वांचे मनापासून आभार....
कैलास गांधी
बुध, 04/04/2012 - 13:41
Permalink
नेहमी प्रमाणेच
नेहमी प्रमाणेच ....भन्नाट!!!!!!!
संतोष खवळे
सोम, 13/08/2012 - 04:12
Permalink
राहते माझ्यासवे
राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा !!!!! वाह!