नाही खचायाचे
नाही खचायाचे कुणाच्याही नकाराने...
-मिळतो दिलासा केवढा नुसत्या विचाराने !
केवळ कुठे झाले तुझे नुकसान पैशांचे?
गेलीच अब्रूही तुझी झाल्या प्रकाराने !
हुसकून लावा फाटकाबाहेर शंभरदा..
लोचट पुन्हा येईल ते मागील दाराने
प्रेमामुळे होते तुझ्यामाझ्यात काहीसे
सारे कसे ते संपले एका कराराने ?
घ्यावेत सल्ले पाहिजे तितके दरेकाचे
जावे अखेऱीला पुढे अपुल्या विचाराने
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
रवि, 24/04/2011 - 18:09
Permalink
घ्यावेत सल्ले पाहिजे तितके
घ्यावेत सल्ले पाहिजे तितके दरेकाचे
जावे अखेऱीला पुढे अपुल्या विचाराने
मस्त है केदारजि...
केदार पाटणकर
गुरु, 28/04/2011 - 15:43
Permalink
धन्यवाद विद्यानंद.
धन्यवाद विद्यानंद.
बेफिकीर
शुक्र, 29/04/2011 - 01:09
Permalink
केदार, अप्रतिम गझल! मागील
केदार,
अप्रतिम गझल! मागील दाराने हा शेर फारच 'खुला खुला' वाटला! ते सोडले तर अप्रतिम गझल! तसेच, तो शेर कदाचित मला लक्षात आला नसावा.
भारी गझल!
धन्यवाद व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
चित्तरंजन भट
शुक्र, 13/05/2011 - 18:23
Permalink
नाही खचायाचे कुणाच्याही
नाही खचायाचे कुणाच्याही नकाराने...
-मिळतो दिलासा केवढा नुसत्या विचाराने !
वाव्वा. एकंदर सुरेख प्रासादिक गझल.
अनिल रत्नाकर
मंगळ, 24/05/2011 - 00:09
Permalink
जावे अखेऱीला पुढे अपुल्या
जावे अखेऱीला पुढे अपुल्या विचाराने
....मस्तच गझल.
शोभातेलन्ग
बुध, 15/06/2011 - 10:25
Permalink
चstrong>rong> केदार् साहेब
चstrong>rong>
केदार् साहेब खुप मस्त
शोभा तेलन्ग इन्दोरी