सारे वसंत...

सारे वसंत मजला छळू लागले
ऐकेक पान माझे गळू लागले

कोठेच रंग नाही मनासारखा
दु:खात सौख्य आहे कळू लागले

सांगा कुणी मला मी कसा सावरु
आधारस्तंभ सारे ढळू लागले

आता नवीन कोठे मरण राहिले
आयुष्य रोज येथे दळू लागले

हासून जीवनाशी जरा बोलता
ईर्शेत लोक सारे जळू लागले

हाका कुणास देऊ अता शेवटी
सारेच ऐनवेळी पळू लागले

गझल: 

प्रतिसाद

वाहवा..... पुन्हा वाचून आनंद झाला. चांगली गझल.

मतला...खूप सुंदर!!!!!

छान झाली आहे गझल विद्यानंदजी... क्या बात है.

वाहवा! गझल आवडली. शुभेच्छा...

हासून जीवनाशी जरा बोलता
ईर्शेत लोक सारे जळू लागले

वाहवा .. हा शेर तर खासच...

आशय आवडला पण नीट म्हणता आली नाही. पुन्हा प्रयत्न करून पाहतो.

धन्यवाद !

धन्यवाद ! मित्रांनो...
बेफिकिरजी, माझेच प्रयत्न कमी पडले असतील...
मार्गदर्शन असु द्या.....