भेटतो जरी अता नेहमी हसून पण

भेटतो जरी अता नेहमी हसून पण..
ठेवलीत आसवे रोजची जपून पण!

पाजळून ज्योत मी लाविला दिवा जरी
राहतो तमात तो कोपरा चुकून पण!

स्वप्नं देउनी नवे रात्र धीर दे मला
रोजचा दिवस नवा खायला टपून पण!

का मला अता पुन्हा 'तू कसा' विचारता?
काळजी बरी नव्हे एवढे लुटून पण!

रे जगा तुझे किती अजून कर्ज फेडणे
शेष राहिले कसे जिंदगी पिसून पण?

गझल: 

प्रतिसाद

पाहिली तुझ्यात मी नितळ प्रेम भावना
माझिया मनीच का वासना टपून पण?

हा शेर आवडला... पुलेशु.

धन्यवाद!!!
डॉ. साहेब...

गझल एकंदर छान आहे. ही केवढी तमा तुला,एवढे लुटून पण? आधीची ओळ अधिक परिणामकारक वाटते आहे. (इथे तुलाऐवजी तुम्हा गृहीत धरले आहे.)

धन्यवाद! दादा.
बदल कसा वाटला?

मतला आवडला.