भेटतो जरी अता नेहमी हसून पण
भेटतो जरी अता नेहमी हसून पण..
ठेवलीत आसवे रोजची जपून पण!
पाजळून ज्योत मी लाविला दिवा जरी
राहतो तमात तो कोपरा चुकून पण!
स्वप्नं देउनी नवे रात्र धीर दे मला
रोजचा दिवस नवा खायला टपून पण!
का मला अता पुन्हा 'तू कसा' विचारता?
काळजी बरी नव्हे एवढे लुटून पण!
रे जगा तुझे किती अजून कर्ज फेडणे
शेष राहिले कसे जिंदगी पिसून पण?
गझल:
प्रतिसाद
कैलास
शनि, 23/10/2010 - 11:12
Permalink
पाहिली तुझ्यात मी नितळ प्रेम
पाहिली तुझ्यात मी नितळ प्रेम भावना
माझिया मनीच का वासना टपून पण?
हा शेर आवडला... पुलेशु.
शाम
मंगळ, 26/10/2010 - 18:26
Permalink
धन्यवाद!!! डॉ. साहेब...
धन्यवाद!!!
डॉ. साहेब...
चित्तरंजन भट
रवि, 24/10/2010 - 10:57
Permalink
गझल एकंदर छान आहे. ही केवढी
गझल एकंदर छान आहे. ही केवढी तमा तुला,एवढे लुटून पण? आधीची ओळ अधिक परिणामकारक वाटते आहे. (इथे तुलाऐवजी तुम्हा गृहीत धरले आहे.)
शाम
सोम, 25/10/2010 - 18:24
Permalink
धन्यवाद! दादा. बदल कसा वाटला?
धन्यवाद! दादा.
बदल कसा वाटला?
आनंदयात्री
मंगळ, 26/10/2010 - 09:14
Permalink
मतला आवडला.
मतला आवडला.