''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन''
वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन
झाकले उघड कसे करायचे?
ठेवले बरेच आज आवरुन
जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन
धूम वारु दौडते मनातले
मी तसाच बांधतो पुन्हा धरुन
पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन
शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?
गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन
काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन
--डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
शाम
शनि, 16/10/2010 - 07:34
Permalink
गंध काय आज जाणले जरी, दु:ख
गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन
काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन
सुंदर! !
अनिल रत्नाकर
शनि, 16/10/2010 - 01:44
Permalink
काळ यायची अवेळ जाहली अवेळ
काळ यायची अवेळ जाहली
अवेळ अत्यंत चपखल.
देखणी, संस्कारित गझल.
गंगाधर मुटे
रवि, 17/10/2010 - 15:31
Permalink
सुरेख गझल.
सुरेख गझल.
अजय अनंत जोशी
रवि, 17/10/2010 - 18:55
Permalink
छान गझल!
छान गझल!
ह बा
सोम, 18/10/2010 - 16:35
Permalink
सुंदर रचना!
सुंदर रचना!
कैलास
बुध, 03/11/2010 - 21:54
Permalink
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. :)
केदार पाटणकर
गुरु, 04/11/2010 - 10:59
Permalink
शेवटचा शेर आवडला.
शेवटचा शेर आवडला.