बुरखा
कशास थोडे मोजुन मापुन
खुशाल द्यावे स्वतःस झोकुन
मनोवनातिल हिरवळ सारी
पातेपाते जावी पेटुन
प्रभा नसावी तमास या अन
प्रकाश जावा अंधःकारुन
नको किनारा जीवनास या
वहात जावे समिंदरातुन
लहालहा या शुष्क जिभेतुन
सारी थुंकी जावी आटुन
अशांत आतिल उधाणास त्या
निवांत जागी द्यावे ओकुन
कणाकणाने केले गोळा
पशापशाने द्यावे उधळुन
मेंदुवरचे कलप उडावे
धोप फुटावे विचार त्यातुन
पांढरपेशी बुरखा द्यावा
अधि टरकावुन मग भिरकावुन
गझल:
प्रतिसाद
माणिक जोशी
गुरु, 26/04/2007 - 13:34
Permalink
विसुनाना... मस्तच !
मतला अन मक्ता प्रचंड आवडला !
ग़जल मस्तच !
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 26/04/2007 - 15:26
Permalink
व्वा व्वा
विसुनाना मत्ला आणि शेवटचा शेर आवडला.
चित्तरंजन भट
गुरु, 26/04/2007 - 15:54
Permalink
वाव्वा
विसुनाना, छोट्या मात्रावृत्तातली छान जोमदार गझल!
कशास थोडे मोजुन मापुन
खुशाल द्यावे स्वतःस झोकुन
वरची ओळ जगावे किती मोजुन-मापुन केल्यास शेर अधिक स्पष्ट होईल काय?
मनोवनातिल हिरवळ सारी
पातेपाते जावी पेटुन
पाते-पाते जावे पेटुन हवे किंवा पाती-पाती जावी पेटुन असे योग्य आहे, असे वाटते. वरची ओळ बदलायला हवी का थोडी?(शेर विशेष कळला नाही. मेंदूचे कलप आणि प्रकाशाचा शेरही. सांगितल्यास उत्तम)
नको किनारा जीवनास या
वहात जावे समिंदरातुन
वाव्वा! या शेरावरून क़तिल शिफ़ाईचा
रास आया नहीं तसकीन का साहिल कोई
मुझको फिर प्यास के दर्या में उतार जाये
हा शेर लगेच आठवला. मस्त.
लहालहा या शुष्क जिभेतुन
सारी थुंकी जावी आटुन
छान!
अशांत आतिल उधाणास त्या
निवांत जागी द्यावे ओकुन
वा!
कणाकणाने केले गोळा
पशापशाने द्यावे उधळुन
वा!
पांढरपेशी बुरखा द्यावा
अधि टरकावुन मग भिरकावुनअधि टाळण्यासाठी आधी फाडुन मग भिरकावुन किंवा टरकावुनी द्यावा भिरकावुन चालेल काय?
पुढच्या गझलेला शुभेच्छा!
विसुनाना
गुरु, 26/04/2007 - 16:34
Permalink
थोडे बदल, थोडे अर्थ...
इस्लाह के लिये बहोत शुक्रिया!
किती जगावे मोजुन मापुन .. असे करतो.
पातेपाते जावी पेटुन -मला पात्या-पात्याने असे म्हणायचे आहे. कोणता शब्द योग्य दिसेल?
आधी फाडुन मग भिरकावुन - हे आवडले.असेच करतो.
माझे डोके थोडे वाकडे असल्याने असे वळणाचे शेर येतात. पोटात घ्यावेत.
विसुनाना
गुरु, 26/04/2007 - 16:40
Permalink
यादगार, आपके इस्लाह की गुजारिश.
आभार.इस्लाह केला तर बरे होईल.
चित्तरंजन भट
गुरु, 26/04/2007 - 20:23
Permalink
पाते पाते जावे पेटुन
प्रसन्न शेंबेकर
शुक्र, 27/04/2007 - 16:17
Permalink
गझल नाही
एक छान कविता आहे ही. गझल म्हणता येणार नाही - कुठल्याच अंगाने.
सोनाली जोशी
शुक्र, 27/04/2007 - 18:14
Permalink
खुलासा
'एखादी रचना गझल नाही' असा प्रतिसाद देतांना कृपया सविस्तर खुलासा करावा अशी सर्व सदस्यांना विनंती.
वृत्त पाळले नाही,
काफिया रदीफ चुकले आहेत
शेर सुटे नाहीत, स्पष्ट नाहीत.
अशी जी काही कारणे असतील ती दिलीत तर नवोदितांना मदत होईल.
ह बा
शनि, 17/07/2010 - 15:24
Permalink
गझल आवडली! शेंबेकरांचे
गझल आवडली!
शेंबेकरांचे स्पष्टीकरण तर आवडलेच आवडले!
आनंदयात्री
रवि, 18/07/2010 - 22:21
Permalink
प्रसन्नजी, स्पष्टीकरण
प्रसन्नजी, स्पष्टीकरण आवडले..
मी आता गझल ही अनुभवण्याची गोष्ट आहे या निष्कर्षाप्रत यायला लागलो आहे...
आधी तंत्र, मग आशय आणि मग अनुभूती हे टप्पे पार पडले की उत्तम गझल लिहिता येईल असं स्वतःला सांगतोय..
बहर
रवि, 18/07/2010 - 23:36
Permalink
विसूनाना... गझल आवडली.
विसूनाना... गझल आवडली. विशेषतः मतला, आणि मक्ता. (काफिया, रदीफ.. आणि अलामतीत मला गडबड वाटली! अधिक जाणकारांस विचारावे.) पण ही त्यामुळे गझलच नाही... असे मत मलाही पटले नाही. अनेक मान्यवर प्रतिसाद देतात... त्यात ते "गझल चांगली आहे... पण..." असे प्रतिसाद देताना मी पाहिले आहेत.. (जे खरंच स्पृहणीय आहे.).प्रतिसादांचा हेतू हा काव्याची, वा कवीची उत्कर्षा करण्यात मदत करणे हा असेल तर ते केंव्हाही चांगले, पण नवीन लिहीणार्याचं खच्चीकरण जर होत असेल, तर असे प्रतिसाद उपयोगापे़क्षा अपायच जास्ती करतात असं माझं मत आहे.
गझल तांत्रीक दृष्ट्या निर्दोष असणे गरजेचे आहे..पण गरज ओलांडल्यावर...
सिर्फ बंदीशो अल्फा़ज ही काफी नही गझल में..
जिगर का खून भी चाहिये कुछ असर के लिये!
कैलास गांधी
सोम, 19/07/2010 - 17:01
Permalink
गझल आवडली! प्रसन्नजी,
गझल आवडली!
प्रसन्नजी, स्पष्टीकरण आवडले.