जुने पेच ते.....
Posted by बहर on Sunday, 11 July 2010
जुने पेच ते पेश होती नव्याने..
पुन्हा खालती पाहिले त्या दिव्याने!
विसंबू नको, ना दिव्यांचा भरवसा..
दिलासा दिला हा, मला काजव्याने!
असे मृत्यूचा शाप ह्या मीलनाला...
तरी का जळाले..पतंगे थव्याने??
मला एकही शब्द सुचला न तेव्हा...
(कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने???)
बरे ताट माझे, रिकामेच होते..
किती दु:ख हे वाढले वाढप्याने!!
जिथे पिंड असती... तिथे कावळेही..
तिथे का घुमावे..उगा पारव्याने??
बहर येत होते... बहर जात होते...
फुलांनाच नाकारले..ताटव्याने!!!
--- बहर.
गझल:
प्रतिसाद
ह बा
सोम, 12/07/2010 - 10:03
Permalink
विसंबू नको, ना दिव्यांचा
विसंबू नको, ना दिव्यांचा भरवसा..
दिलासा दिला हा, मला काजव्याने!
मला एकही शब्द सुचला न तेव्हा...
(कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने???)
बरे ताट माझे, रिकामेच होते..
किती दु:ख हे वाढले वाढप्याने!!
बहर येत होते... बहर जात होते...
फुलांनाच नाकारले..ताटव्याने!!!
चारही शेर भावले. अप्रतिम!
वैभव देशमुख
सोम, 12/07/2010 - 10:13
Permalink
बरे ताट माझे, रिकामेच
बरे ताट माझे, रिकामेच होते..
किती दु:ख हे वाढले वाढप्याने!!
वा.....
ज्ञानेश.
सोम, 12/07/2010 - 10:42
Permalink
वाढप्याचा शेर मस्त
वाढप्याचा शेर मस्त आहे.
मक्ताही आवडला.
पुलेशु.
प्रसाद लिमये
सोम, 12/07/2010 - 16:27
Permalink
मला एकही शब्द सुचला न
मला एकही शब्द सुचला न तेव्हा...
(कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने???)
बरे ताट माझे, रिकामेच होते..
किती दु:ख हे वाढले वाढप्याने!!
हे दोनही शेर पार आवडले, मस्त
बहर
सोम, 12/07/2010 - 22:40
Permalink
ह बा , ज्ञानेश, वैभव,
ह बा , ज्ञानेश, वैभव, प्रसादजी.. सर्वांचेच प्रतिसादांबद्दल आभार.
आनंदयात्री
सोम, 12/07/2010 - 22:48
Permalink
गझल आवडली..
गझल आवडली..
योगेश घाडिगा्वकर
सोम, 12/07/2010 - 22:58
Permalink
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर रचना...
फक्त...
असे मृत्यूचा शाप ह्या मीलनाला...
तरी का जळाले..पतंगे थव्याने??
हा शेर वाचताना, यातील प्रश्नार्थक दुसरया ओळिमुळे हा paradox पद्धतीचा वाटतो पण आशय paradox वाटत नाही.
मला सुचलेला हा बदल
असे मृत्यूचा शाप ह्या मीलनाला...
म्हणोनि जळाले, हे पतंगे थव्याने...
चूकभूल क्षमस्व
योगेश घाडिगावकर
निलेश कालुवाला
मंगळ, 13/07/2010 - 14:36
Permalink
मला एकही शब्द सुचला न
मला एकही शब्द सुचला न तेव्हा...
(कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने???)
बरे ताट माझे, रिकामेच होते..
किती दु:ख हे वाढले वाढप्याने!!
हे दोन्ही शेर खुप छान आहेत.
विसंबू नको, ना दिव्यांचा भरवसा..
दिलासा दिला हा, मला काजव्याने!
असाच एक शेर मी खुप अगोदर लिहून ठेवला होता.तो असा...
तमाच्यापुढे मीच अंधारताना
दिली वेगळी मज दिशा काजव्याने
हा फक्त एकच...तुम्ही अख्खी गझल लिहिलीत वा.....
चित्तरंजन भट
मंगळ, 13/07/2010 - 14:40
Permalink
एकंदर रचना चांगली आहे.
एकंदर रचना चांगली आहे. अलामतीवर लक्ष द्या. अशावेळी जमीन मोकळी करणारा एखादा मतला लिहितात.
बहर
बुध, 14/07/2010 - 19:15
Permalink
योगेशजी.. शमा आणि परवाना
योगेशजी.. शमा आणि परवाना ह्यांचे प्रेम आणि त्यातील त्रासदी ह्याबद्दलचे अनेक शेर उर्दू साहित्यात आहेत. शमा आणि परवाना हा दाखला खरं म्हणजे खूप जुना आहे. मी प्रयोग म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आहे. पतंग्याला जर माहितच असतं की दिव्याच्या ज्योतीशी होणारं आपलं मीलन हे आपला प्राण घेणारंच आहे.. तरीही तो झपाटल्यासारखा धावून जातो. हा विरोधाभास अर्थात paradox आहे असं माझं मत. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
आणि हो... योगेशजी.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद द्यायचेच राहून गेले!
धन्यवाद.