दु:ख माझे सोबती !
दु:ख माझे सोबती !
तू बिलोरी वेदनांची लालसा आहे !
मी नकोशा चेहर्यांचा आरसा आहे !
सज्जनांना लाभलाहो न्याय हा अंती
मी भिकारी लक्तरांचा वारसा आहे !
पुंडलीका वीट देवा तू नको मांडू
विठ्ठलाची आस कोठे माणसा आहे ?
फास घ्याया लागले ते वीर जे होते
का निखारा थंड आता कोळसा आहे ?
बोलली तू 'सोड आता गाव हे माझे ! '
मी तसा सोडून दुनिया छानसा आहे !
दु:ख माझे सोबती अन् सोयरे होते
पण सुखाचा घाव आता खोलसा आहे !
प्रशांत वेळापुरे
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 26/05/2010 - 16:51
Permalink
छान गझल... डॉ.कैलास
छान गझल...
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/06/2010 - 12:46
Permalink
दु:ख माझे सोबती अन् सोयरे
दु:ख माझे सोबती अन् सोयरे होते
पण सुखाचा घाव आता खोलसा आहे !
छान.
'पण' च्या ऐवजी 'अन्' चालले असते का?
ह बा
शुक्र, 04/06/2010 - 16:31
Permalink
आवडलेला शेर : दु:ख माझे सोबती
आवडलेला शेर :
दु:ख माझे सोबती अन् सोयरे होते
पण सुखाचा घाव आता खोलसा आहे !
गझल छानच!!
प्रशान्त वेळापुरे
सोम, 14/06/2010 - 12:03
Permalink
प्रतिसादा बद्दल आभार
प्रतिसादा बद्दल आभार !
प्रशान्त