तळ

तळ मनाचा खोदतोय;
मीच मजला शोधतोय.

भोवती बहिरा जमाव;
मी किती झंकारतोय.

नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय.

तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय.

आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय...

गझल: 

प्रतिसाद

अतिशय चांगला प्रयत्न आहे.
तळ मनाचा शोधतोय - चांगली कल्पना.
तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय = चांगला शेर.
पुढील लेखनास शुभेच्छा!

नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय

अजय यांनी उल्लेख केलेल्या शेराखेरिज हा शेर सुद्धा आवडला.

डॉ.कैलास

तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय. >>>> मस्त ... आवडला...

पुलेशु.

सुरेख!

मस्त! सगळ्याच द्विपदी आवडल्या.

गझल छान. शुभेच्छा.

धन्यवाद...