तळ
तळ मनाचा खोदतोय;
मीच मजला शोधतोय.
भोवती बहिरा जमाव;
मी किती झंकारतोय.
नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय.
तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय.
आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय...
गझल:
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
तळ मनाचा खोदतोय;
मीच मजला शोधतोय.
भोवती बहिरा जमाव;
मी किती झंकारतोय.
नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय.
तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय.
आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय...
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
गुरु, 20/05/2010 - 23:32
Permalink
अतिशय चांगला प्रयत्न आहे. तळ
अतिशय चांगला प्रयत्न आहे.
तळ मनाचा शोधतोय - चांगली कल्पना.
तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय = चांगला शेर.
पुढील लेखनास शुभेच्छा!
कैलास
शुक्र, 21/05/2010 - 00:27
Permalink
नाव त्याचे घेतलेस; मज उखाणा
नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय
अजय यांनी उल्लेख केलेल्या शेराखेरिज हा शेर सुद्धा आवडला.
डॉ.कैलास
मिल्या
रवि, 23/05/2010 - 23:52
Permalink
तू अता येऊ नकोस; मी मला
तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय. >>>> मस्त ... आवडला...
पुलेशु.
योगेश्वर रच्चा
सोम, 24/05/2010 - 01:58
Permalink
सुरेख!
सुरेख!
क्रान्ति
सोम, 24/05/2010 - 08:28
Permalink
मस्त! सगळ्याच द्विपदी
मस्त! सगळ्याच द्विपदी आवडल्या.
चित्तरंजन भट
मंगळ, 25/05/2010 - 07:20
Permalink
गझल छान. शुभेच्छा.
गझल छान. शुभेच्छा.
मिलिन्द हिवराले
सोम, 14/06/2010 - 17:29
Permalink
धन्यवाद...
धन्यवाद...