जायला हवे !
.................................................
...जायला हवे !
.................................................
मन विसकटून, चुरगळून जायला हवे !
जगणे जरा तरी मळून जायला हवे !
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !
नक्की कधीतरी जमेल...आज ना उद्या...
फुलल्याविनाच दरवळून जायला हवे !
माझे तुझ्याविना न पान हालते जरी...
मी एकटेच सळसळून जायला हवे !
हे रोजचे जिणे नव्हे जिणे; तुरुंग हा...
आता इथून मज पळून जायला हवे !
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो खरा...!
मागे न पाहता वळून जायला हवे !
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
हा देह पापशून्य व्हायचा कधी ? कसा?
आता किती, कसे जळून जायला हवे ?
मी-तू किती उजेड पाडला तसा इथे ?
आता मला-तुला ढळून जायला हवे !
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
शुक्र, 14/05/2010 - 22:29
Permalink
वा वा फार सुरेख. अतिशय सुरेख
वा वा
फार सुरेख.
अतिशय सुरेख
चक्रपाणि
शुक्र, 14/05/2010 - 23:05
Permalink
खूपच छान गझल. आवडली.
खूपच छान गझल. आवडली.
बेफिकीर
शनि, 15/05/2010 - 07:17
Permalink
फुलल्याविनाच दरवळून - ही
फुलल्याविनाच दरवळून - ही कल्पना आवडली. इतर कल्पना आधीच वाचल्यासारख्या वाटल्या.
मात्र येथे उल्लेख करणे कदाचित उचित ठरावे की आपली मनोगतवर नेमकी याचवेळी झळकलेली 'फांदी' ही गझल उत्कृष्ठ आहे.
-'बेफिकीर'!
क्रान्ति
शनि, 15/05/2010 - 08:06
Permalink
हे रोजचे जिणे नव्हे जिणे;
हे रोजचे जिणे नव्हे जिणे; तुरुंग हा...
आता इथून मज पळून जायला हवे !
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो खरा...!
मागे न पाहता वळून जायला हवे !
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
वा! सगळ्याच द्विपदी सरस, पण वरच्या खास आवडल्या.
अतिशय सुंदर गझल!
सतीश
शनि, 15/05/2010 - 10:54
Permalink
प्रदीपजी, गजल आवडली. माझे
प्रदीपजी,
गजल आवडली.
माझे तुझ्याविना न पान हालते जरी...
मी एकटेच सळसळून जायला हवे !
हा शेर विशेषच आवडला. 'पान न हालणे' च्या सोबत 'सळसळून जाणे' ची जोडणी अप्रतिम आहे !
-सतीश.
प्रदीप कुलकर्णी
शनि, 15/05/2010 - 12:36
Permalink
दिलखुलास प्रतिसादांबद्दल
दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
चित्तरंजन भट
शनि, 15/05/2010 - 17:28
Permalink
प्रदीपराव, अख्खी गझल भयंकर
प्रदीपराव, अख्खी गझल भयंकर आवडली. क्या बात है!
गंगाधर मुटे
शनि, 15/05/2010 - 18:10
Permalink
सुंदर गझल.
सुंदर गझल.
अनंत ढवळे
रवि, 16/05/2010 - 18:10
Permalink
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !
सुंदर गझल !
ह बा
मंगळ, 18/05/2010 - 12:00
Permalink
येते कधी तरी अजूनही
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
सर्वच शेर उत्तम!
अजय अनंत जोशी
मंगळ, 18/05/2010 - 17:33
Permalink
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे ! .... खरे आहे
माझे तुझ्याविना न पान हालते जरी...
मी एकटेच सळसळून जायला हवे ! .... खरे आहे. मस्त.
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो खरा...!
मागे न पाहता वळून जायला हवे ! ... वा वा! मस्त!
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
अस्पष्ट वाटते आहे. कोण तरंगुनी येते? हे 'माझ्यात दु:ख' या शब्दरचनेमुळे पूर्णपणे स्पष्ट होत नाही असे वाटते. कारण वर 'जे' - 'ते' असे प्रयोजन नाही.
हा देह पापशून्य व्हायचा कधी ? कसा?
आता किती, कसे जळून जायला हवे ? वा वा ! मस्त!
बर्याच दिवसांनी तुमची गझल पाहिल्यावर आनंद वाटला.
धन्यवाद!
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 18/05/2010 - 17:50
Permalink
दिलखुलास प्रतिसादांबद्दल
दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
ज्ञानेश.
बुध, 19/05/2010 - 15:16
Permalink
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो खरा...!
मागे न पाहता वळून जायला हवे !
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
सुरेख शेर !
गझल आवडली.
मिल्या
सोम, 24/05/2010 - 00:02
Permalink
व्वा बरेच दिवसांनी
व्वा बरेच दिवसांनी प्रदीपजी...
गझल आवडली
विशेषतः खळबळून, दरवळून, सळसळून हे तीन खूपच आवडले..