पण आज अचानक कळले...

जो मार्ग निवडला होता, वाटले फुलांचा रस्ता
पण आज अचानक कळले, काट्यांनी भरला होता...

 

हास्यात हुंदक्यांना मी आवरून गेलो
पण एक अनावर हुंदका केव्हाच निसटला होता...

 

मी शोधत होतो माझे चांदणे गौर पुनवेचे
अन सभोवती अवसेचा काळोख दाटला होता...

 

मी समजत होतो आता डाव हा जिंकलो आहे
पण शेवटचा फासा तर नियतीच्या हाती होता...

 

परि जीवन सुंदर होते, जगणेही सोपे होते
जोवरी तुझ्या असण्याचा आभास बोलका होता...

 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

हास्यात हुंदक्यांना मी आवरून गेलो
पण एक अनावर हुंदका केव्हाच निसटला होता...
ह्या
दोन ओळी सोडल्यास इतर सर्व ओळी एकाच वृत्तात आहेत. कल्पना चांगल्या आहेत.
शैलीही छान आहे. ह्या जमेच्या बाजू आहेत. पण ह्या गझलेत मतला नाही, अलामत पाळली गेलेली नाही आहे.  गझलेच्या व्याकरणाचा अभ्यास करावा. (रदीफ़, काफिया, वगैरे वगैरे..)
अलामतीवर अधिक माहितीसाठी खालील दोन पाने वाचावीत-