स्वरचिन्ह उर्फ अलामत-२

स्वरचिन्ह उर्फ अलामत-२

गझल लिहिण्यासाठी फक्त शेवटपर्यंत एकाच वृत्तात लिहून भागत नाही, तर एकदा पहिल्या शेरात यमक आपल्या स्वरचिन्हासह प्रस्थापित झाले की, अलामतीसकट काफियाचे स्वरूप स्पष्ट झाले की, मग शेवटपर्यंत त्या अलामतीच्या कायद्यानुसारचे, ते स्वरचिन्ह सांभाळून नंतरचे यमकाचे शब्द योजावे लागतात.

उदाहरणार्थ-
हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्यादिव्यातून बाटलेला

माझ्या एका गझलेचे हे दोन शेर आहेत. पहिल्या शेरात "छाटलेला" आणि "फाटलेला" असे दोन यमकाचे शब्द आहेत. येथे जर काळजीपूर्वक विचार केला, तर आपणास असे आढळून येईल की, गझलेच्या पहिल्या शेरातच यमकाचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे.

ह्या यमकात शेवटची ती अक्षरे - "ट-ले-ला" ही अटळ आहेत, आणि त्याआधी येणाऱ्या "छा" आणि "फा" ह्या प्रत्येक अक्षरात "" ही अलामत आहे. ह्याच कायद्यानुसार ह्या गझलेत "काटलेला, दाटलेला, पहाटलेला, थाटलेला, वाटलेला, झपाटलेला" असे यमक म्हणून शब्द येतील. कारण 'ट-ले-ला' ह्या शेवटच्या तीन न बदलणाऱ्या अक्षरांआधी येणाऱ्या 'का, दा, हा, था, वा, पा' ह्या अक्षरांत न चुकता '' ह्या स्वराची अलामत आलेली आहे. म्हणजे आधी '' हा स्वर असलेले, '' ही अलामत असलेले अक्षर आणि नंतर 'ट-ले-ला' ही शेवटची तीन न बदलणारी अक्षरे, असे हे यमक आहे.

अलामत गझलेनुसार येणाऱ्या विविध यमकात आपली जागा बदलू शकते. उदाहरणार्थ-
मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो
मी न केली चौकशी साधी घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो

ह्या गझलेत सूर, दूर, आणि पूर ह्या यमकात '' ही अलामत आहे. शेवटचे अक्षर 'र' हे आहे. येथे यमकातील शेवटून दुसऱ्या अक्षरात अलामत आहे.  ही अलामत सूर, दूर आणि पूर यमकातील 'सू, दू, आणि पू' ह्या शेवटून दुसऱ्या अक्षरातील '' ह्या स्वरांची आहे. ह्याच गझलेतील अजून एक शेर पहा-
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो

ह्या शेरातील 'नामंजूर' ह्या यमकातील 'जू' ह्या अक्षरात सुरवातीचीच '' ही अलामत आली आहे. मात्र 'र' ह्या शेवटच्या अक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरातच '' ही अलामत आहे.
मघाशी आपण पाहिले की, 'ट-ले-ला' ह्या तीन न बदलणाऱ्या (छाटलेला, फाटलेला) अक्षरांआधी येणाऱ्या शेवटून चौथ्या अक्षरात '' ही अलामत होती. तर आता वरील शेरात '' ही अलामत असून तिचे स्थान मात्र यमकाच्या शेवटून दुसऱ्या अक्षरात आहे.
गझलेच्या पहिल्या शेरात 'जमीन' निश्चित होते. जमीन म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आधी झालेले आहेच. परंतु ह्या जमिनीत असलेले यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच ठरवते. आणि ह्या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवटपर्यंत यमक ऊर्फ काफिया चालवायचा असतो.
अलामत म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी आता मी शेवटचे उदाहरण देतो -
बेरका होता दिलासा मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
वरील शेरात 'धीर, खंजीर' आणि 'गंभीर'  ह्या यमकातील 'धी, जी, आणि भी' ह्या अक्षरात '' ह्या स्वराची अलामत आहे. शेवटचे 'र' हे अक्षर मात्र कायम!