कसे मानू
कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही
कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही
कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही
कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही
उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही
कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही
उपेक्षित सोन-स्वप्नांची अपेक्षा व्यर्थ तू धरते
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही
तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही
- जनार्दन केशव म्हात्रे
प्रतिसाद
जनार्दन केशव म्...
बुध, 16/06/2010 - 13:23
Permalink
जरी म्हणतेस प्रेमावर तुझा
जरी म्हणतेस प्रेमावर तुझा विश्वासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही
कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही
कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही
कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही
उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही
कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही
उपेक्षित सोन-स्वप्नांची अपेक्षा व्यर्थ तू धरते
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही
तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही
-जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
जनार्दन केशव म्...
बुध, 16/06/2010 - 13:26
Permalink
मतल्यामध्ये बदल केला आहे, तरी
मतल्यामध्ये बदल केला आहे, तरी प्रतिसादामध्ये पाठविलेली गझल नव्याने प्रकाशित करावी.....
धन्यवाद....
ह बा
बुध, 16/06/2010 - 13:49
Permalink
उद्या माझ्या घराजवळी सुखे
उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही
हे महत्वाचे आहे. शेर ठिक.
तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही
उत्क्रुष्ट!!
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
हे पटले नाही.
गझल छान!
जनार्दन केशव म्...
बुध, 16/06/2010 - 13:56
Permalink
उगवले पेरल्यावाचुन असा
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
हे पटले नाही.
का ते कळले नाही....
ह बा
बुध, 16/06/2010 - 14:21
Permalink
उगवले पेरल्यावाचुन असा
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
हे पटले नाही.
का ते कळले नाही....
हे कळण्याइतपत आपण जाणते आहात. आपण मांडलेल्या विचाराविषयी ('उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही') विचार केल्यास, कदाचित असे नसावे असे मला वाटते. पेरल्यावाचून ही काही पिकं उगवली असतील. जगातली पहिली गझल व्याकरणाच्या सरीत(शेतातली) नक्कीच उगवली नसेल. ती मोकळ्या माळरानात रुजली असेल. भिकार्याच्या हातात १०० ची नोट पडली म्हणजे त्याने देणार्यावर आधि उपकार केले होते असे नसते. न लावताही कधी कधी अनपेक्षीत सुखाचं झाड अंगणभर सावली देत उभा राहतं. इ.इ.इ.
(माझे विचार कदाचित तुम्हाला न पटणारे असू शकतात. तरिही आपण मनावर घेणार नाही ही अपेक्षा.)