वार कुणावर...

वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही...


कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही...


व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...


वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...


बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...


गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...


हात सोडणारेच भेटले 'अजब', म्हणूनच-
हात कुणाचा मलाच हाती धरवत नाही...

गझल: 

प्रतिसाद

अप्रतिम...
अजब, संपूर्ण गझल आवडली.
वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...

बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...

गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...

हे तिन्ही शेर अफलातून...!  शुभेच्छा...
 
 

प्रदीपशी अगदी सहमत. अख्खी गझल फार फार आवडली.
गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...

वावा क्या बात है.

अप्रतीम गझल आहे अजब. अभीनंदन.

व्वा

गझल आवडली

गझल आवडली ! फारच छान !!

गझल फार आवडली! मनाचे हट्ट आणि खोड हे शेर तर खूपच मस्त आहेत!!
-- पुलस्ति.

अतीशय सुंदर गझल...
शुभेच्छा "अजब"

सुरेख !!! फारच छान !!!!
गझल आवडली. १ला आणी शेवटचा शेर तर अप्रतिम..
चन्द्रकान्त

आवडली गझल् ..सगळे शेर साधेच पण अर्थपूर्ण

-मानस६

अजब,
गझल आवडली. मतला सुंदर आहे.
कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही...
वा!
- कुमार

व्वा अप्रतिम गझल!!!

वा!!
 गझल फार आवडली...

मतला  छान ,गिरवत ,पुरवत ,फिरवत ,जिरवत  हे  शेर  छानच  !

सुंदर.
कुणावर केलीय?

कित्ते आवडला.

वा अजब साहेब,
जिरवत हा शेर अफाट आहे.
उच्च गझल !

अप्रतिम ........सुरेख

 
गझल आवडली...........
व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...



वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...



बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...

गझल किती दिवसांनी वाचली पुन्हा!
नवीन प्रतिसादांमुळे वर आली,धन्यवाद!
मतला,पुरवत हे तर खास शेर!

झकास!
नारळ ठेवा खुष व्हा!