वार कुणावर...
वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही...कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही...व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...हात सोडणारेच भेटले 'अजब', म्हणूनच-
हात कुणाचा मलाच हाती धरवत नाही...
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 30/09/2007 - 19:14
Permalink
अप्रतिम, अजब
अप्रतिम...
अजब, संपूर्ण गझल आवडली.
वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...
बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...
गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...
हे तिन्ही शेर अफलातून...! शुभेच्छा...
चित्तरंजन भट
रवि, 30/09/2007 - 21:10
Permalink
अगदी सहमत
प्रदीपशी अगदी सहमत. अख्खी गझल फार फार आवडली.
गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...
वावा क्या बात है.
उदय नावलेकर
रवि, 30/09/2007 - 21:41
Permalink
अप्रतीम
अप्रतीम गझल आहे अजब. अभीनंदन.
समीर चव्हाण (not verified)
सोम, 01/10/2007 - 09:43
Permalink
सहज सुंदर गझल
व्वा
सोनाली जोशी
सोम, 01/10/2007 - 17:18
Permalink
सहमत
गझल आवडली
संजय
सोम, 01/10/2007 - 17:42
Permalink
छान
गझल आवडली ! फारच छान !!
पुलस्ति
सोम, 01/10/2007 - 19:16
Permalink
मस्तच!
गझल फार आवडली! मनाचे हट्ट आणि खोड हे शेर तर खूपच मस्त आहेत!!
-- पुलस्ति.
हर्षद पवार (not verified)
रवि, 07/10/2007 - 20:58
Permalink
सुंदर
अतीशय सुंदर गझल...
शुभेच्छा "अजब"
चन्द्र्कान्त सोनार
बुध, 10/10/2007 - 19:44
Permalink
प्रतिसाद
सुरेख !!! फारच छान !!!!
गझल आवडली. १ला आणी शेवटचा शेर तर अप्रतिम..
चन्द्रकान्त
मानस६
गुरु, 11/10/2007 - 20:48
Permalink
आवडली
आवडली गझल् ..सगळे शेर साधेच पण अर्थपूर्ण
-मानस६
कुमार जावडेकर
गुरु, 11/10/2007 - 22:35
Permalink
वा!
अजब,
गझल आवडली. मतला सुंदर आहे.
कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही... वा!
- कुमार
अमोल शिरसाट
मंगळ, 16/10/2007 - 18:49
Permalink
अजब.......!!!!!!!
व्वा अप्रतिम गझल!!!
चांदणी लाड.
गुरु, 01/01/2009 - 00:48
Permalink
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही..
वा!!
गझल फार आवडली...
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 02/01/2009 - 13:09
Permalink
अप्रतिम गझल!
मतला छान ,गिरवत ,पुरवत ,फिरवत ,जिरवत हे शेर छानच !
श्रीनिवास (not verified)
शनि, 03/01/2009 - 17:19
Permalink
छान!
सुंदर.
कुणावर केलीय?
श्रीनिवास (not verified)
गुरु, 08/01/2009 - 17:37
Permalink
कित्ते
कित्ते आवडला.
भूषण कटककर
सोम, 12/01/2009 - 09:42
Permalink
जिरवत नाही
वा अजब साहेब,
जिरवत हा शेर अफाट आहे.
उच्च गझल !
महेश गोरे (not verified)
सोम, 12/01/2009 - 11:15
Permalink
अप्रतिम
अप्रतिम ........सुरेख
दशरथयादव
सोम, 12/01/2009 - 18:16
Permalink
गझल
गझल आवडली...........
व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...
वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...
बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...
योगेश वैद्य
सोम, 12/01/2009 - 23:17
Permalink
ही
गझल किती दिवसांनी वाचली पुन्हा!
नवीन प्रतिसादांमुळे वर आली,धन्यवाद!
मतला,पुरवत हे तर खास शेर!
भिकारदास मारुती
सोम, 12/01/2009 - 23:36
Permalink
झकास
झकास!
नारळ ठेवा खुष व्हा!