भेटत राहू

वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू

थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू

भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू

गझल: 

प्रतिसाद

मस्त, काहीशी खट्याळ गझल. आवडली.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू ..... वा मस्त
-मानस६

मस्त आवडली गझल.

सगळे शेर छान झालेत!
गझल आवडली!

अगदी गोड झाली आहे गझल.

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू

हे शेर मस्त वाटले.

भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

"नको घालवू सोनेरी क्षण...?"

वा वा.
सगळेच शेर आवडले.
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

घालवू नको मध्ये गेयता जात असल्याने ज्ञानेश यांनी सुचवलेले बदल योग्य वाटताहेत.......
बाकी गझल तर मस्तच...

डॉ.कैलास

सर्वांना धन्यवाद.
नको घालवू मधे ओघवतेपण जास्त आहे, असे मलाही वाटते. चांगली सूचना.

केदार,
फार सुंदर गझल लिहिलीत.

वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू
यात मात्र वसंत आणि श्रावण तशा सिमिलर भावना आहेत.

थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू
हा फार मस्त शेर..!!

भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
फार छान शेर..!!

एकंदरीत मस्त.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू............अहा क्या बात है !!
मस्त मस्त मस्त :)
खूप आवडली गझल !!

जोशी, जयश्रीताई,

आभार.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
वाव्वा.. गझल एकंदरत लोभसवाणी झाली आहे. आवडली.

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू

- छान.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू

- पहिली ओळ प्रश्नात्मक केली असतीत तर अधिक मजा आली असती. ( आणि ` असे न आहे ` हेही टाळता आले असते.)

एकंदरीत, नाजूक, मृदू-मवाळ गझला छान लिहिता आपण, केदारराव.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू

क्या बात है!!!!!

चित्तरंजन, प्रदीप व मधुघट...
धन्यवाद.
भावनांना नेमक्या शब्दांत पकडणे, यात मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मृदुपणापेक्षा थेट-व्यवहारी-कडक विचारांकडे माझा कल अधिक आहे, असे वाटते.

मस्त गझल! सगळेच शेर खास!

शेवटचा शेर आवडला.

खुप आवडली. सगळेच आवडले.

क्रांती, बेफिकीर व प्रताप,
धन्यवाद.

व्वा....! मस्त गझल.

बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू

गझल चांगली.

बिरुटे, हबा...
धन्यवाद.