भेटत राहू
वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू
थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू
ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
गझल:
प्रतिसाद
चक्रपाणि
मंगळ, 09/03/2010 - 12:59
Permalink
मस्त, काहीशी खट्याळ गझल.
मस्त, काहीशी खट्याळ गझल. आवडली.
मानस६
मंगळ, 09/03/2010 - 16:08
Permalink
बोलायाला हवेच काही, असे न
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू ..... वा मस्त
-मानस६
गंगाधर मुटे
मंगळ, 09/03/2010 - 19:30
Permalink
मस्त आवडली गझल.
मस्त आवडली गझल.
ऋत्विक फाटक
मंगळ, 09/03/2010 - 20:25
Permalink
सगळे शेर छान झालेत! गझल
सगळे शेर छान झालेत!
गझल आवडली!
ज्ञानेश.
मंगळ, 09/03/2010 - 20:43
Permalink
अगदी गोड झाली आहे गझल. ठिकाण
अगदी गोड झाली आहे गझल.
ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
हे शेर मस्त वाटले.
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू
"नको घालवू सोनेरी क्षण...?"
सोनाली जोशी
बुध, 10/03/2010 - 00:43
Permalink
वा वा. सगळेच शेर
वा वा.
सगळेच शेर आवडले.
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू
कैलास
बुध, 10/03/2010 - 09:05
Permalink
भेटायाचे हेच खरे तर वय आहे
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू
घालवू नको मध्ये गेयता जात असल्याने ज्ञानेश यांनी सुचवलेले बदल योग्य वाटताहेत.......
बाकी गझल तर मस्तच...
डॉ.कैलास
केदार पाटणकर
बुध, 10/03/2010 - 09:21
Permalink
सर्वांना धन्यवाद. नको घालवू
सर्वांना धन्यवाद.
नको घालवू मधे ओघवतेपण जास्त आहे, असे मलाही वाटते. चांगली सूचना.
अजय अनंत जोशी
बुध, 10/03/2010 - 16:26
Permalink
केदार, फार सुंदर गझल
केदार,
फार सुंदर गझल लिहिलीत.
वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू
यात मात्र वसंत आणि श्रावण तशा सिमिलर भावना आहेत.
थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू
ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू
हा फार मस्त शेर..!!
भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
फार छान शेर..!!
एकंदरीत मस्त.
जयश्री अंबासकर
बुध, 10/03/2010 - 17:00
Permalink
बोलायाला हवेच काही, असे न
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू............अहा क्या बात है !!
मस्त मस्त मस्त :)
खूप आवडली गझल !!
केदार पाटणकर
गुरु, 11/03/2010 - 10:41
Permalink
जोशी, जयश्रीताई, आभार.
जोशी, जयश्रीताई,
आभार.
चित्तरंजन भट
गुरु, 11/03/2010 - 11:34
Permalink
बोलायाला हवेच काही, असे न
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
वाव्वा.. गझल एकंदरत लोभसवाणी झाली आहे. आवडली.
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 11/03/2010 - 12:49
Permalink
ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे
ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू
- छान.
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
- पहिली ओळ प्रश्नात्मक केली असतीत तर अधिक मजा आली असती. ( आणि ` असे न आहे ` हेही टाळता आले असते.)
एकंदरीत, नाजूक, मृदू-मवाळ गझला छान लिहिता आपण, केदारराव.
मधुघट
शुक्र, 12/03/2010 - 11:33
Permalink
बोलायाला हवेच काही, असे न
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
क्या बात है!!!!!
केदार पाटणकर
शनि, 13/03/2010 - 13:05
Permalink
चित्तरंजन, प्रदीप व
चित्तरंजन, प्रदीप व मधुघट...
धन्यवाद.
भावनांना नेमक्या शब्दांत पकडणे, यात मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मृदुपणापेक्षा थेट-व्यवहारी-कडक विचारांकडे माझा कल अधिक आहे, असे वाटते.
क्रान्ति
शनि, 13/03/2010 - 16:20
Permalink
मस्त गझल! सगळेच शेर खास!
मस्त गझल! सगळेच शेर खास!
बेफिकीर
रवि, 14/03/2010 - 09:00
Permalink
शेवटचा शेर आवडला.
शेवटचा शेर आवडला.
प्रताप
मंगळ, 16/03/2010 - 09:34
Permalink
खुप आवडली. सगळेच आवडले.
खुप आवडली. सगळेच आवडले.
केदार पाटणकर
गुरु, 18/03/2010 - 10:53
Permalink
क्रांती, बेफिकीर व
क्रांती, बेफिकीर व प्रताप,
धन्यवाद.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुक्र, 19/03/2010 - 19:36
Permalink
व्वा....! मस्त गझल.
व्वा....! मस्त गझल.
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 16:58
Permalink
बोलायाला हवेच काही, असे न
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत राहू
गझल चांगली.
केदार पाटणकर
गुरु, 17/06/2010 - 11:06
Permalink
बिरुटे, हबा... धन्यवाद.
बिरुटे, हबा...
धन्यवाद.