मरणानंतर
ताटवा भोवतीला तो फुलांचा
आडवा देह झाला तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
काळ हा सोबतीला दो क्षणांचा
कापली बंधने कोणीतरी ती
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा
धावले भोवतीने माझिया ते
घाव जोरात केला पत्थरांचा
अश्म आता कसा हा ठोकरावा
मुफ्त्त ना बोलबाला खापरांचा
व्हायला हो नको तो कावळा मी
तो नको जन्म झाला नेहमीचा
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
रवि, 03/01/2010 - 17:02
Permalink
धावले भोवतीने माझिया ते घाव
धावले भोवतीने माझिया ते
घाव जोरात केला पत्थरांचा
फार छान.
अनिल रत्नाकर
सोम, 04/01/2010 - 14:32
Permalink
धन्यवाद, अजयजी.
धन्यवाद, अजयजी.
बेफिकीर
सोम, 04/01/2010 - 18:23
Permalink
श्री. अनिल, कृपया आपली मते
श्री. अनिल,
कृपया आपली मते कळवावीत. मला ही गझल फारशी लक्षात आली नाही. माफ करावेत.
ताटवा भोवतीला तो फुलांचा -
आडवा देह झाला तो मघाचा - मतला समजला नाही.
(अनुस्वार असलेला 'आ' व नुसता 'आ' यात माझ्यामते फरक आहे. )
संपला स्नेह भूमीचा अता हा - छान!
काळ हा सोबतीला दो क्षणांचा - 'दो'! (शेर आवडला.)
कापली बंधने कोणीतरी ती -
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा - हा शेर समजला नाही.
धावले भोवतीने माझिया ते
घाव जोरात केला पत्थरांचा - समजला नाही.
अश्म आता कसा हा ठोकरावा
मुफ्त्त ना बोलबाला खापरांचा - समजला नाही.
व्हायला हो नको तो कावळा मी
तो नको जन्म झाला नेहमीचा - 'अलामत'? शेर समजला नाही.
अनिल रत्नाकर
मंगळ, 05/01/2010 - 00:08
Permalink
बेफिकीरजी, प्रतिसादाबद्द्ल
बेफिकीरजी,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद,
मी मेलो आहे, सरणावर आहे, मला फुले वाहिली आहेत.(आयुष्यभर कोणी फुलही दिले नाही, आता हारावर हार.)
मेल्यानंतर अंगावरील बंधने तोडतात, काढतात. जसे: गळ्यातील, कमरेचे, हातातील, बोटातील इ. मुक्त होणार्या आत्म्याचे अडथळे दूर करणे, हाच उद्देश असावा.( मनातले कधी मोकळेपणाने उपभोगता आले नाही, निदान आता तरी सारे निर्बंध तोडता येतात का बघू या.)
मी मडके घेऊन त्रिवार प्रदक्षिणा घालतो आहे, प्रत्येक फेरीनंतर मडक्याला भोक पाडले जात आहे. (साधारणपणे जवळ्चेच जखमा करतात.)
तिरडी आत नेताना अंगठ्याने स्पर्शलेला अश्म(दगड) आता आत्म्याचे निवासस्थान आहे. इथे खापराला कींमत नाही. (काही काळ का होईना मी कठोर झालो आहे.)
मेल्यावर प्रत्येकवेळी कावळा होणे मला आवडत नाही. (शाकाहारी माणसाच्या पिंडाला मांसाहारी कावळ्याने शिवणे जरा विचित्र वाटते.) अलामतीत चूक झाली. .
स्पष्टपणे मांडणे शक्य झाले नाही.
क्शमस्व
अनिल रत्नाकर
बुध, 13/01/2010 - 20:57
Permalink
कोणास दुखावणे हा उद्देश
कोणास दुखावणे हा उद्देश नाही.
काही रिवाज खटकतात आणि ते माझे मत आहे. चूक भुल द्यावी घ्यावी.