संपादन सुविधा
बऱ्याचदा लिखाण करताना सुशोभीकरण (फॉरमॅटिंग) जसे की ठळक अक्षरे, तिरकी अक्षरे, अधोरेखन, रंगीत अक्षरे, आकडेवार यादी इ. करणे आवश्यक असते. त्यासाठी साहाय्यक अशी संपादन सुविधा इथे लिहिण्याच्या प्रत्येक खिडकीसोबत जोडलेली आहे.
इतर संकेतस्थळांपेक्षा इथे असणारी सुविधा थोडीशी वेगळी आहे. इतर ठिकाणच्या संपादन सुविधा "wysiwyg" म्हणजे "what you see is what you get" या प्रकाराच्या असतात. इथे असणारी संपादन सुविधा तश्या प्रकारची नाही. इथे वेगवेगळ्या बटनांवर टिचकी मारली असता एचटीएमएल भाषेतील मजकूर संपादन खिडकीत उमटतो.
संपादन सुविधा वापरून सुशोभीकरण करण्याची साधारण पद्धत अशी,
- सुशोभीकरण करायचे लेखन निवडा (सिलेक्ट करा)
- संपादन खिडकीच्या वर असणाऱ्या वेगवेगळ्या बटनांतून योग्य त्या बटनावर टिचकी मारा.
- त्यानंतर तुम्ही निवडलेल्या लिखाणाच्या सुरुवातीला आणि शेवटी एचटीएमएल भाषेतील मजकूर उमटेल.
- खिडकीच्या वर असणाऱ्या भिंगाच्या चित्रावर टिचकी मारली असता हे लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल.
- पुन्हा भिंगाच्या चित्रावर टिचकी मारून संपादन खिडकीत परतता येईल.
अश्याच प्रकारे पुढे दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्रिया करता येतील
चित्र/बटन | क्रिया |
लिखाण ठळक करणे |
|
लिखाण तिरके करणे |
|
अधोरेखन करणे |
|
लिखाण डाव्या बाजूला चिकटवणे |
|
लिखाण मध्यात आणणे |
|
लिखाण उजव्या बाजूला चिकटवणे |
|
लिखाण उजवीकडे (समासाबाहेर) सरकवणे |
|
आकडेवार यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी) |
|
ठिपक्यांची यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी) |
|
अक्षरांचा रंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा) |
|
अक्षरांच्या पार्श्वरंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा) | |
लिखाण उद्धृत करणे |
|
सुशोभीकरण काढून टाकणे (लिखाणातील काही भाग निवडून जर या बटनावर टिचकी मारली तर फक्त त्या भागातील सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते आणि फक्त मजकूर उरतो. जर काही लिखाण न निवडता या बटनावर टिचकी मारली तर संपूर्ण लिखाणातून सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते.) |
|
मजकुरात चित्र चिकटवणे. (मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन या बटनावर टिचकी मारावी. त्यानंतर उघडणाऱ्या छोट्या खिडकीत चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भराव्या आणि 'Submit' या बटनावर टिचकी मारावी. |
|
दुवा (वेब लिंक) देणे (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यात दुवा आणि दुव्याचे नाव या गोष्टी भराव्या.) |
|
या बटनावर टिचकी मारली की लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल. संपादन खिडकीत परतण्यासाठी पुन्हा याच बटनावर टिचकी मारावी. |