मी मोरपीस व्हावे -
Posted by विदेश on Friday, 23 October 2009
मी मोरपीस व्हावे
गालावरी फिरावे,
मी एक फूल व्हावे
केसात नित रहावे,
मी एक झुळुक व्हावे
पदरास झुळझुळावे,
मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे,
काही जरी मि व्हावे
मजसाठि तू असावे !
गझल:
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
शनि, 24/10/2009 - 10:46
Permalink
मोरपिसाप्रमाणेच नाजुक आहे ही
मोरपिसाप्रमाणेच नाजुक आहे ही कविता!
"मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे"
हे काही कळलं नाही, बोट दातात रुतत नाही.
बेफिकीर
शनि, 24/10/2009 - 14:58
Permalink
छान व नाजूक रचना! आशय सरळ आला
छान व नाजूक रचना! आशय सरळ आला असे वाटले.
-बेफिकीर!
गणेश गव्हाणे
गुरु, 04/02/2010 - 19:26
Permalink
अप्रतिम .......
अप्रतिम .......