मी मोरपीस व्हावे -

मी मोरपीस व्हावे
गालावरी फिरावे,

मी एक फूल व्हावे
केसात नित रहावे,

मी एक झुळुक व्हावे
पदरास झुळझुळावे,

मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे,

काही जरी मि व्हावे
मजसाठि तू असावे !

गझल: 

प्रतिसाद

मोरपिसाप्रमाणेच नाजुक आहे ही कविता!

"मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे"
हे काही कळलं नाही, बोट दातात रुतत नाही.

छान व नाजूक रचना! आशय सरळ आला असे वाटले.

-बेफिकीर!

अप्रतिम .......