कुठून जायचे पुढे

मला अशाच निश्चयाकडून जायचे पुढे
इथे-तिथे, कुठेतरी उरून जायचे पुढे

उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!

मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !

सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे ?

जसा प्रवास वाहिला, विदीर्ण सूर्य जाहला
मिळे विदग्ध सावली नि ऊन जायचे पुढे !

निरोप हा तुझा असे, 'निरोप घ्यायचा तुझा'...
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!

गझल: 

प्रतिसाद

निरोप हा तुझा असे, 'निरोप घ्यायचा तुझा'...
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!
सुंदर  शेर  आणि  प्रासादिक  गझल.

संपुर्ण गझल आवडली.

उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!      वा..!! सही एकदम, फार आवडला हा शेर.मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !     मस्तच.

सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे       सुंदर..

छान गझल अजय...

मलाही हाच शेर जास्त आवडला.

उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!
मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !
सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे ?
जसा प्रवास वाहिला, विदीर्ण सूर्य जाहला
मिळे विदग्ध सावली नि ऊन जायचे पुढे !
हे शेर खूपच खास!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

गझल चांगली झाली आहे. सुटून, चुकून, निघून पुढे जाणे विशेष!

हा शेर अप्रतिम आहे! फार फार आवडला!!

सर्वांना मनापासून धन्यवाद!
कलोअ चूभूद्याघ्या