कुठून जायचे पुढे
मला अशाच निश्चयाकडून जायचे पुढे
इथे-तिथे, कुठेतरी उरून जायचे पुढे
उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!
मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !
सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे ?
जसा प्रवास वाहिला, विदीर्ण सूर्य जाहला
मिळे विदग्ध सावली नि ऊन जायचे पुढे !
निरोप हा तुझा असे, 'निरोप घ्यायचा तुझा'...
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
सोम, 13/07/2009 - 15:56
Permalink
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!
निरोप हा तुझा असे, 'निरोप घ्यायचा तुझा'...
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!
सुंदर शेर आणि प्रासादिक गझल.
चांदणी लाड.
सोम, 13/07/2009 - 17:47
Permalink
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!
उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..! वा..!! सही एकदम, फार आवडला हा शेर.मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे ! मस्तच.
सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे सुंदर..
भूषण कटककर
सोम, 13/07/2009 - 17:59
Permalink
चांगली गझल
छान गझल अजय...
सोनाली जोशी
सोम, 13/07/2009 - 18:10
Permalink
वावा
मलाही हाच शेर जास्त आवडला.
क्रान्ति
सोम, 13/07/2009 - 18:23
Permalink
सगळीच गझल आवडली.
उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!
मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !
सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे ?
जसा प्रवास वाहिला, विदीर्ण सूर्य जाहला
मिळे विदग्ध सावली नि ऊन जायचे पुढे !
हे शेर खूपच खास!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
चित्तरंजन भट
मंगळ, 14/07/2009 - 13:03
Permalink
सुटून, चुकून, निघून पुढे जाणे विशेष.
गझल चांगली झाली आहे. सुटून, चुकून, निघून पुढे जाणे विशेष!
पुलस्ति
मंगळ, 14/07/2009 - 20:38
Permalink
वा!!!
हा शेर अप्रतिम आहे! फार फार आवडला!!
अजय अनंत जोशी
शुक्र, 17/07/2009 - 18:45
Permalink
धन्यवाद!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
कलोअ चूभूद्याघ्या