घार
मारले घारीस काही पारव्यांनी
'पिंजर्यामध्ये सिकंदरश्या' थव्यांनी
वर्ण केले चार जेव्हा आपल्यांचे
शोधला त्यांचा मनू मग पाचव्यांनी
आपला पत्ताच सूर्याला मिळेना
काढली आकाशगंगा काजव्यांनी
ओढतो आहेस त्यांची वात सध्या
साजरी झाली दिवाळी ज्या दिव्यांनी
काढली कोणी जरा शोधून काढा
वाट जी चोखाळली आहे नव्यांनी
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
मंगळ, 07/07/2009 - 13:32
Permalink
शेवटचा शेर
शेवटचा शेर चांगला.
मतला कृपया सोपा करावा.
खलिश
शनि, 11/07/2009 - 09:36
Permalink
मारले घारीस काही पारव्यांनी
भूषण साहेब,
फार छान गझल आहे.
सारे च शेर आवडले. गझल चुकून नज़र अन्दाज़ झाली.
` खलिश ' -
अजय अनंत जोशी
सोम, 13/07/2009 - 10:35
Permalink
वाट जी चोखाळली आहे नव्यांनी
आपला पत्ताच सूर्याला मिळेना
काढली आकाशगंगा काजव्यांनी
ओढतो आहेस त्यांची वात सध्या
साजरी झाली दिवाळी ज्या दिव्यांनी
हे आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
बुध, 15/07/2009 - 14:10
Permalink
काढली आकाशगंगा काजव्यांनी
आपला पत्ताच सूर्याला मिळेना
काढली आकाशगंगा काजव्यांनी सही आहे हा शेर
काढली कोणी जरा शोधून काढा
वाट जी चोखाळली आहे नव्यांनी
हे शेर आवडले.