आकांत
प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता
यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता
तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता
वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?
गझल:
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता
यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता
तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता
वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?
प्रतिसाद
जयश्री अंबासकर
मंगळ, 09/06/2009 - 13:50
Permalink
सगळीच गझल
सगळीच गझल आवडली गं....!!
पहिले दोन शेर तर फारच :)
ज्ञानेश.
गुरु, 11/06/2009 - 11:17
Permalink
छान.
सुंदर गझल.
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
शेर फार आवडला.
पुलेशु.
शांत्सुत
शुक्र, 12/06/2009 - 14:19
Permalink
सुंदर
सुंदर गझल.
शांत्सुत एक आनंद यात्री ...
पुलस्ति
सोम, 15/06/2009 - 21:21
Permalink
हेच
मलाही एकांत शेर फार आवडला!!
आनंदयात्री
गुरु, 18/06/2009 - 16:33
Permalink
सावल्यांच
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
वाव्वा........
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!