हे तेवढे बरे झाले

हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

गझल: 

प्रतिसाद

सुन्दर्..शेर
दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले
कलोअ चूभूद्याघ्या

दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
इथे लिहीणारे सगळेच फार छान लिहितात त्यामुळे जरा घाबरत घाबरतच इथे गजल सादर करायचा प्रयत्न केला.

मोगरा शेर फार आवडला श्यामली!

एवढे हे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले.... हे सर्वच शेर छान!
जयन्ता५२

श्यामली, ह्या संकेतस्थळावर तुमची रचना बघून आनंद झाला. इथे लिहीत राहा. वाचत राहू. माझ्यामते, दोन ओळींतले अंतर फार जास्त झाले आहे असे वाटले. थोडी अधिक स्पष्टता आल्यास उत्तम.

धन्यवाद चित्तरंजन.
याओळीतल्या अंतराबद्दल विचार नक्की करेन.

गजल अगदीच बाळबोध आहे हे मीही जाणते, पण तुम्ही लोक प्रोत्साहन देताय त्यामुळे बरं वाटलं जरा .   खूप खूप धन्यवाद. :)

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले  (हा हा खरचं...!!)
खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले (वा क्या बात है.!)

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले? (मस्तच)

तुम्हाला गझल लेखनास मनापासुन शुभेच्छा..!! पुढिल गझलेची वाट पाहत आहे. :)