हे तेवढे बरे झाले
हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले
चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले
दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले
खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले
बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?
मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले
गझल:
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले
चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले
दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले
खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले
बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?
मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले
प्रतिसाद
दशरथयादव
मंगळ, 17/03/2009 - 13:08
Permalink
सुन्दर्..शे
सुन्दर्..शेर
दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले
खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले
बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?
मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले
अजय अनंत जोशी
मंगळ, 17/03/2009 - 18:10
Permalink
वादळाचे बरे झाले
दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले
कलोअ चूभूद्याघ्या
श्यामली
मंगळ, 17/03/2009 - 20:11
Permalink
धन्यवाद
दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
इथे लिहीणारे सगळेच फार छान लिहितात त्यामुळे जरा घाबरत घाबरतच इथे गजल सादर करायचा प्रयत्न केला.
पुलस्ति
मंगळ, 17/03/2009 - 22:06
Permalink
छान!
मोगरा शेर फार आवडला श्यामली!
जयन्ता५२
मंगळ, 17/03/2009 - 22:56
Permalink
बदलले काहीच नव्हते...
एवढे हे बरे झाले
शाप सारे खरे झाले
चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले
बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?
मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले.... हे सर्वच शेर छान!
जयन्ता५२
चित्तरंजन भट
बुध, 18/03/2009 - 00:05
Permalink
श्यामली,
श्यामली, ह्या संकेतस्थळावर तुमची रचना बघून आनंद झाला. इथे लिहीत राहा. वाचत राहू. माझ्यामते, दोन ओळींतले अंतर फार जास्त झाले आहे असे वाटले. थोडी अधिक स्पष्टता आल्यास उत्तम.
श्यामली
बुध, 18/03/2009 - 18:16
Permalink
ओळींतले अंतर
धन्यवाद चित्तरंजन.
याओळीतल्या अंतराबद्दल विचार नक्की करेन.
श्यामली
बुध, 18/03/2009 - 10:33
Permalink
पुलस्ति,जयंता
गजल अगदीच बाळबोध आहे हे मीही जाणते, पण तुम्ही लोक प्रोत्साहन देताय त्यामुळे बरं वाटलं जरा . खूप खूप धन्यवाद. :)
चांदणी लाड.
सोम, 13/04/2009 - 16:19
Permalink
चांदणे घाबरे
चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले (हा हा खरचं...!!)
खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले (वा क्या बात है.!)
बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले? (मस्तच)
तुम्हाला गझल लेखनास मनापासुन शुभेच्छा..!! पुढिल गझलेची वाट पाहत आहे. :)