...चुकले असावे
वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे
पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे
आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे
"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे
ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे
(जयन्ता५२)
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शुक्र, 27/02/2009 - 15:20
Permalink
वा!
पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे
वा!
आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे
वा!
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे
वा!
वरील शेर फार आवडले. चुकले असावे ह्या अन्त्ययमकामुळे मजा आली आहे. गझल छान आकर्षक झाली आहे.
ज्ञानेश.
शुक्र, 27/02/2009 - 23:20
Permalink
सहमत...
चित्तरंजन यांच्याशी सहमत आहे. मलाही हेच तीन शेर जास्त आवडले.
कमी शब्दात भरपूर सांगणे हे तुमचे वैशिष्ठ्य आहे !
अजय अनंत जोशी
गुरु, 16/04/2009 - 22:21
Permalink
गुंतणे
ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
शनि, 18/04/2009 - 12:38
Permalink
चांदणे चुकले असावे!
आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे (सुंदर)
ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे (छान.)
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे! (वा..! क्या बात है :)
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे (समर्पक शेर.)
एकंदर गझल आवडली.
आनंदयात्री
रवि, 19/04/2009 - 13:24
Permalink
गाव माझाही
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!
फार सहज आलाय... (असं वाटतं..)
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
प्रसन्न शेंबेकर
सोम, 20/04/2009 - 11:40
Permalink
तो म्हणे
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे
क्या बात है !
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"
मृदुला
बुध, 22/04/2009 - 08:05
Permalink
चांदणे.
उत्तम छोटेखानी गझल. चांदणे व मागणे विशेष.