...चुकले असावे


वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे


पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे


आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे

"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे


ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे


गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!


तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे


(जयन्ता५२)

गझल: 

प्रतिसाद

पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे
वा!
आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे

वा!
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे
वा!
वरील शेर फार आवडले. चुकले असावे  ह्या अन्त्ययमकामुळे मजा आली आहे. गझल छान आकर्षक झाली आहे.
 
 
 

चित्तरंजन यांच्याशी  सहमत आहे. मलाही  हेच  तीन  शेर  जास्त  आवडले.
कमी  शब्दात भरपूर  सांगणे हे  तुमचे  वैशिष्ठ्य  आहे !

ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे
कलोअ चूभूद्याघ्या

आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे  (सुंदर)

ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे   (छान.)
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे! (वा..! क्या बात है :)
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे (समर्पक शेर.)
एकंदर गझल आवडली.

गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!
फार सहज आलाय... (असं वाटतं..)
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे

क्या बात है !

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

उत्तम छोटेखानी गझल. चांदणे व मागणे विशेष.