सवे या..
सवे या चांदण्यांच्या मी कशाला जागलो होतो ?
फुलांशी मी कुणासाठी, कशाला बोललो होतो ?
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
पुढे वेगात जाणे हे मलाही शक्य होते पण..
..तुझ्यासाठीच मागे मी जरासा थांबलो होतो
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'
-केदार पाटणकर
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
रवि, 22/02/2009 - 11:53
Permalink
छान.
केदार, छान गझल.
हा शेर आवडला-
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
काही शेरांत अजून थोडी अनपेक्षितता/ कलाटणी असायला हवी होती असे वाटले. चूभूद्याघ्या.
केदार पाटणकर
सोम, 23/02/2009 - 11:40
Permalink
आभारी आहे
ज्ञानेश,
आभारी आहे.
या एकंदर गझलेत अनपेक्षितता सापडली तर औषधाला सापडेल. :)
वैभव जोशी
सोम, 23/02/2009 - 16:25
Permalink
वा !
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
इथे सापडली अनपेक्षितता :) सुंदर आलाय शेर.
चित्तरंजन भट
सोम, 23/02/2009 - 20:36
Permalink
माझ्यामते
माझ्यामते अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी अत्यंत सापेक्ष आहेत. काहींना जे शेर अगदी अनपेक्षिततापूर्ण, कलाटणीयुक्त वाटतात ते तसे काहींना वाटतीलच असे नाही. त्यामुळे अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी शेर लिहिताना डोळ्यांपुढे ठेवून शेर लिहायला हवा असे मला वाटत नाही. तसेच नेहमीच्या कल्पनांना (बहुधा नाटकीय) कलाटणीची फोडणी दिली म्हणजे शेर चांगला होत नसतो. हे असले चटपटीत शेर दीर्घायुषी नसतात, असे मला वाटते. शेरात वाचकाशी संवाद साधणारा सच्चेपणा, प्रामाणिकपणा असणेही महत्त्वाचे आहे. असो. अनेक गोष्टी आहेत.
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'
हे शेरही
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
ह्या शेराएवढेच चांगले आहेत. एकंदर छान झाली आहे गझल.
सोनाली जोशी
सोम, 23/02/2009 - 20:51
Permalink
मस्त
केदारगझल आवडली.
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
हे शेर मुख्यतःशुभेच्छासोनाली
पुलस्ति
सोम, 23/02/2009 - 20:58
Permalink
सहमत
मलाही ओलावलो आणि वागलो हे दोन्ही शेर फार आवडले!
ज्ञानेश.
मंगळ, 24/02/2009 - 01:58
Permalink
सहमत आहे.
चित्तरंजन यांचा मुद्दा योग्य आहे. त्यामुळे अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी शेर लिहिताना डोळ्यांपुढे ठेवून शेर लिहायला हवा असे मला वाटत नाही. तसेच नेहमीच्या कल्पनांना (बहुधा नाटकीय) कलाटणीची फोडणी दिली म्हणजे शेर चांगला होत नसतो...
मंजूर आहे. या गझलेतले शेर चांगले नाहीत, असे मला म्हणायचे नव्हते. गैरसमज नसावा.
धन्यवाद!
चित्तरंजन भट
मंगळ, 24/02/2009 - 02:38
Permalink
माझे मत मांडले
या गझलेतले शेर चांगले नाहीत, असे मला म्हणायचे नव्हते.
तुम्हाला असे म्हणायचे आहे असे सुचवायचे नव्हते. प्रतिसादात अनपेक्षिततेचा/कलाटणी चा उल्लेख झाला. त्यावर माझे मत मांडावेसे वाटले. दुसरे काही नाही. ह्या निमित्ताने चर्चा होते. अशा चर्चा व्हायला हव्यात.
नचिकेत
मंगळ, 24/02/2009 - 12:11
Permalink
व्वा!!!
गझल आवडली.
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो >> हे मस्त आले आहेत.
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'
ह्या शेराने माझ्या,
काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?
ह्या शेराची आठवण झाली.
अभिनंदन व पु.ले.शु
~ नचिकेत
केदार पाटणकर
मंगळ, 24/02/2009 - 15:20
Permalink
आभारी आहे
प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
चर्चेबद्दल आनंदी.
प्रसाद लिमये
गुरु, 26/02/2009 - 22:06
Permalink
क्या बात है
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?
अजय अनंत जोशी
गुरु, 26/02/2009 - 23:29
Permalink
हा हा
गम्मतशीर प्रतिसाद आहेत. म्हणजे आशयाच्या कलाटणीऐवजी मतांनाच कलाटणी मिळतेय. हं... निवड्णुका आल्या वाटतं जवळ.
केदार,
ही गझल मला आवडली.
कलोअ चूभूद्याघ्या
जयन्ता५२
शुक्र, 27/02/2009 - 01:20
Permalink
गझल आवडली
गझल आवडली ,केदार!
मक्ता अप्रतिम.
जयन्ता५२
केदार पाटणकर
रवि, 01/03/2009 - 12:12
Permalink
आभारी आहे
प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे.
मिल्या
सोम, 02/03/2009 - 10:41
Permalink
मस्त
केदार
आवडलो, वागलो हे शेर आवडले...
अनंत ढवळे
मंगळ, 03/03/2009 - 10:37
Permalink
नचिकेत
छळणे , भाळ्णे, वागणे आल्याशिवाय पूर्ण होईल ती गझल कसली : ) दहापैकी नऊ गझला ( आणि त्यातला दहापैकी नऊ शेरांमध्ये ) बहुतेक वेळा हेच असतं ! त्यामुळे तुम्हाला बहुतेक गझला वाचताना तुमचे शेर आठवण्याची दाट शक्यता आहे !!!
नचिकेत
सोम, 18/10/2010 - 19:58
Permalink
.
.
बेफिकीर
मंगळ, 19/10/2010 - 01:46
Permalink
बेसिकली फार सुंदर गझल आहे.
बेसिकली फार सुंदर गझल आहे.
कलाटणी वगैरे बाजूला ठेवू! अशा हळुवार विषयांवर किंवा हळुवार उल्लेख असलेल्या गझला तरी कुठे आहेत?
ही एक सच्ची गझल वाटली! केदार, अभिनंदन!
तुमचा वेग फार कमी आहे हा एक प्रॉब्लेम आहे असे माझे मत!
(प्रकाशित करण्याचा!)
-'बेफिकीर'!