तू दिलेली सोडचिट्ठी...

==================


राख  नाही, ना  कुठेही  धूर  थोडासा
काळजाचा  पेटला  कापूर  थोडासा..


भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!


वाहतो  आहेस  तू  रक्तातूनी  माझ्या,
का  तरीही  वाटशी  तू  दूर  थोडासा?


तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..


थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..


सांत्वनाची  फार  घाई  चांगली  नाही,
ओसरूदे  भावनेचा  पूर  थोडासा...


 


 


-ज्ञानेश.
====================

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,
खूपच छान.
सर्वच शेर तोलामोलाचे. त्यातही हे पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे...
तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..
थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..
सांत्वनाची  फार  घाई  चांगली  नाही,
ओसरू दे  भावनेचा  पूर  थोडासा...


 

 

ज्ञानेश, काय गझल लिहिली आहेस!! केवळ अप्रतिम. प्रत्येक शेर आवडला.

भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!.... सहज सुंदर

थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा.... वा!
-मानस६


भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!
...
थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..
....
तुम्हाला माझे लोटांगण!!!!:)

पुन्हा पुन्हा वाचण्याजोगी. सुंदर.
संकल्पना तशा जुन्याच आहेत. तरीही मांडणी छान.
कलोअ चूभूद्याघ्या

राख  नाही, ना  कुठेही  धूर  थोडासा
काळजाचा  पेटला  कापूर  थोडासा..
वा..वा. काय सफाईदार मतला आहे.
भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!
फार आवडला! फार चांगला फील आहे शेराला. एकंदरच गझल चांगली झाली आहे.

अप्रतिम गझल!

भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!


वाहतो  आहेस  तू  रक्तातूनी  माझ्या,
का  तरीही  वाटशी  तू  दूर  थोडासा?


तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..


थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..
 
अप्रतिम आले आहेत शेर . शुभेच्छा

बहोत खूब!
ज्ञानेश, तुम्ही सुन्दर गझला लिहिता.
Dhananajay
 

 
गझल आवडली....
भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!
वाहतो  आहेस  तू  रक्तातूनी  माझ्या,
का  तरीही  वाटशी  तू  दूर  थोडासा?

तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..
थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..

परत एक्दा ...
ज्ञनेश ....  परत एक्दा ... दंडवत....
शब्दच नाहीत यार....

एक मस्त गझल .
सर्वच शेर आवडले. उत्तम. उत्तम.

आवडली. भूतकाळ, मजकूर विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

राख  नाही, ना  कुठेही  धूर  थोडासा
काळजाचा  पेटला  कापूर  थोडासा..
खासच !!
सगळेच शेर जबरी आहेत.

फारच मस्त आहे गझल.

खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..
यामधून "दूध गरम लागले तर ताकही फुंकून प्यावे" या उक्तीची आठवण होते. त्याहीपेक्षा विश्वासघाताने आलेले शहाणपण चांगल्या पद्ध्तीने सुचविले आहे. बहोत खूब

गझल सुंदर आहे त्यातही  केदारने उल्लेखलेले पहिले दोन शेर अतिशय आवडले

प्रतिसादाबद्दल  सगळ्यांचे  आभार.

भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!
 
सांत्वनाची  फार  घाई  चांगली  नाही,
ओसरू दे  भावनेचा  पूर  थोडासा...

वा ! खुप आवड्ले, मनाला भावले!....

खुपच सुन्दर !!!!!
सांत्वनाची  फार  घाई  चांगली  नाही,
ओसरूदे  भावनेचा  पूर  थोडासा...
अप्रतिम्....अगदी वास्तव आहे.....