पहिल्यासारखे

श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?


पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे


आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे


आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे


कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे


दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे


 

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय गौतमी,
छान रचना आहे. 'खास' हा शेर आवडला. सन्माननीय कवयित्री चांदणी लाड यांच्या 'खास जागी' च्या जवळपास गेलेला आहे आपला 'खास गुंते' हा शेर!

 
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे


दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
 
हे दोन्ही छान....... सुंदर

छान गझल.
सुबकता आहेच. सरावाने अधिक सफाई येईल.
गंध लगडावे..हा शेर तर केवळ  झकास. अंदाज...कातिलाना !

आपण लिहीत रहा.  शुभेच्छा!

शेर आवडले
सुरेख..........
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
संपले सारे पुराणे त्रास पहिल्यासारखे



आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे



दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे

भूषणजी, प्रसादजी, केदारजी, दशरथजी,
खूप खूप आभार!
केदारजी,
आपले मार्गदर्शन मिळू शकेल काय?



आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
संपले सारे पुराणे त्रास पहिल्यासारखेछान.. या द्विपदीत पुराणे नको होते का? पहिल्यासारखे आणि पुराणे शेवटी जुन्या काळातच नेत आहेत असे वाटते. 

आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखेवा..

दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
वाव्वा...

गझल आवडली.

भास आणि गंध हे शेर आवडले!
 

पुलस्तीजी
खूप आभार!
चित्तरंजनजी
दाद दिल्याबद्दल तसेच सुधारणा सुचवल्याबद्दल खूप आभार. द्विपदी थोडी बदलली आहे. बदल कसा आहे यावर मतप्रदर्शन व्हावे अशी इच्छा आहे.
'सासुरवास' ही एक नवीन द्विपदी रचून सादर करत आहे. रसिकांना भावेल अशी अपेक्षा!

बदल सुरेख, नवीन शेर ही छान
 

श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे (हाय!! क्या बात है!)
संपूर्ण गझल आवडली...हे शेर खास आवडले.

केसातले गुंते कोण कशाला शोधेल?  मी लहान आहे. पण कायतरीच वाटले.
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
गंध लगडावे    हे काव्य चांगले वाटले.

मार्गदर्शन करण्याएवढा मी मोठा नाही.
स्थळावर बरेच तज्ज्ञ आहेत.

विनंती, सूचना, बदल सुचवणे..या गोष्टी करत आलो आहे, यापुढेही करेन.
आपापसात चर्चा केल्यानेही खूप फायदा होतो.

बदल चांगला आहे. ती ओळ अधिक प्रवाही झाली आहे.

गझल  खूपच  सुरेख  आहे.
यावरची  गम्भीर  समीक्षकांची  समीक्षा  वाचायला  खूप  आवडेल.

अर्चना,
लहान मी पण आहे. अगदी लहान नाही, पण तशी लहानच.
पण गुंते शोधणेचा अर्थ कळेल तुला.
तुझे खूप आभार!

श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?
एक प्रश्न! एका स्त्रीने आपल्या प्रियकराला वा पतीला विचारलेला! गझलेचा विचार! आयुष्य आपली वळणे घेत जात आहे. काळानुसार खूप बदल होतात. ( पुढील एका शेरावरून संबोधित व्यक्ती पती असणार हे सिद्ध होत आहेच ) पती आपल्या व्यावसायिक बंधनांमधे जखडलेला. अशाच एका कातरवेळी ( कवयित्रीसाठी कवी हा शब्द वापरत आहोत, नेहमीप्रमाणे ) कवीला जुन्या काळाची आठवण होते. सुनेत्रा सुभाष यांच्या 'डोल सख्यारे' नंतर पहिल्यांदा समीक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. कदाचित आम्हीही आमच्या सहधर्मचारिणीला सर्व काही देऊ शकलो नसू. वाईट वाटते. आता तो काळही गेला. सहज अन घुसणारा शेर!

 
पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे
हा कवी सुटला आहे. आम्ही जास्ती काहीही लिहू शकत नाही.
धन्यवाद!
गंभीर समीक्षक

 
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे

 
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे

 
कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे

 
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे

नाही येणार.
आम्ही ब्रह्मचारी!

दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे....
लाघवी शब्द-योजना असलेली गझल.. उत्तम
-मानस६